IMPIMP

SSC HSC Exams | दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांसाठी आता 50 ऐवजी 25 रुपये शुल्क

by nagesh
SSC HSC Exams | ssc hsc students have to pay rs 25 instead of rs 50 for concession marks decision taken after opposition from students parents

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   दहावी आणि बारावी बोर्डाच्या (SSC HSC Exams) परीक्षेत आता सवलतीच्या गुणांसाठी (Concession Marks) 50 रुपयांऐवजी 25 रुपये द्यावे लागणार आहेत. चालू वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काव्यतीरिक्त अतिरिक्त 50 रुपये आकारले जाणार होते. पण त्यात आता 50 टक्के कपात केली आहे. विद्यार्थी (Students), पालक (Parents ) आणि शिक्षक संघटनांनी (Teachers Associations) या शुल्काला विरोध केला होता. 50 रुपये शुल्क विरोधात पालकांनी आणि शिक्षक संघटनांनी राज्य शिक्षण मंडळाकडे (State Board of Education) शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता शुल्क 25 रुपये करण्यात (SSC HSC Exams) आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चित्रकला, शास्त्रीय कला, लोककला, खेळ, एनसीसी, स्काऊट आणि गाईड या क्षेत्रांत प्राविण्य मिळविणाऱ्या
विद्यार्थ्यांना विशेष सवलतीचे गुण दिले जातात. त्यामुळे त्यांच्या एकूण निकालाचा टक्का वाढण्यास मदत होते.
विद्यार्थ्यांसाठी हे गुण महत्वाचे असतात. त्यासाठी विद्यार्थी शाळा आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून महामंडळाला (बोर्ड) प्रस्ताव सादर करतात. मात्र यासाठी मागील अनेक वर्षे कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते.
पण फेब्रुवारी – मार्च 2023 च्या नवीन धोरणानुसार यासाठी परीक्षा शुल्क व्यतिरिक्त (SSC HSC Exams) वेगळे
50 रुपये विद्यार्थ्यांकडून आकारले जाणार होते.
त्याला विरोध झाल्यानंतर आता यात कपात करून 50 ऐवजी 25 रुपये आकारण्यात येणार आहेत.

 

शिक्षणाधिकारी (Education Officer), जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून (District Sports Officer) सवलतीच्या
गुणांचे प्रस्ताव शाळा आणि विभागीय शिक्षण मंडळाकडे (Divisional Board of Education) येत असतात.
या सर्व प्रस्तावांची छाननी करावी लागते.
त्यानंतर त्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधितांशी पत्रव्यवहार करुन त्रुटींची दुरूस्ती करावी लागते.
त्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर रोजंदारी कर्मचारी नेमावे लागतात.
या कामासाठी लागणारा वेळ आणि माणसे यांचा विचार करुन 50 रुपये छाननी शुल्क आकारण्याचा निर्णय
घेतल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले होते.

 

 

Web Title :- SSC HSC Exams | ssc hsc students have to pay rs 25 instead of rs 50 for concession marks decision taken after opposition from students parents

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, तर…; संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल

Rohit Pawar | मुंबईतील बसेसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती; रोहित पवारांनी ट्वीट केले फोटो

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray | संभाजीनगरमधील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

 

Related Posts