IMPIMP

Rohit Pawar | मुंबईतील बसेसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती; रोहित पवारांनी ट्वीट केले फोटो

by nagesh
Rohit Pawar | ncp rohit pawar share mumbai bus photo over karnataka government advertisement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – गेले अनेक दिवस महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तापला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमाप्रश्नावर आडमुठेपणाची
भूमिका घेत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये येणाऱ्या मंत्र्यांना रोखले होते. तसेच महाराष्ट्राचे खासदार जेव्हा गृहमंत्री अमित शहा यांना भेटले
होते, त्यावर देखील प्रतिक्रिया देताना बोम्मई म्हणाले, गृहमंत्र्यांना भेटून काही उपयोग नाही. आम्ही आमची एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही.
तरी देखील बोम्मई यांना न जुमानता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) बेळगावमध्ये दाखल झाले होते. त्यांनी तेथे प्रसार माध्यमांशी संवाद साधून महाराष्ट्राच्या मंत्र्यांना प्रश्न केला होता. मी कर्नाटकात येऊ शकतो, तर महाराष्ट्रातील मंत्री का येत नाहीत? असे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आता या सीमाप्रश्नावर पुन्हा नव्याने वाद होण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईच्या बेस्ट बसेसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती लावल्या गेल्या आहेत. त्याबाबात रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. रोहित पवार ट्वीट करत लिहितात, “कर्नाटकच्या लोकांना विरोध नाही. परंतु, सीमा भागातील मराठी भाषिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता, तसेच सीमाप्रश्नावरून मराठी अस्मिता दुखावण्याचे व महाराष्ट्राला आव्हान देण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण बघता, मुंबईत अशा जाहिराती बघितल्यावर नक्कीच खंत वाटते. आपल्या सरकारने यावर विचार करायला हवा.”

 

 

 

यावेळी रोहित पवारांनी राज ठाकरेंवर देखील टीका केली. पवार म्हणाले, मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा चाहता आहे. पण सध्या ते कुठेतरी भाजपचा विचार घेऊन पुढे जात असल्याचे दिसून येते. राज ठाकरे यांनी स्वतःची ओरिजनल स्टाईल कायम ठेवावी. भाजप आपली राजकीय पोळी भाजून घेत असेल, तर त्याला आपण पाठिंबा का देत आहात? राजकारण हे तात्पुरते असते. विचार हे दीर्घकालीन असतात. त्यामुळे तुम्ही तुमची भूमिका घ्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rohit Pawar | ncp rohit pawar share mumbai bus photo over karnataka government advertisement

 

हे देखील वाचा :

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray | संभाजीनगरमधील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

Pune Crime | पुण्यात गाईसोबत अनैसर्गिक कृत्य, फुरसुंगीमधील संतापजनक प्रकार

NCP-Prachi Pawar | नाशिकमध्ये प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला

 

Related Posts