IMPIMP

ST Bus Accident | लातूर-पुणे-वल्लभनगर एसटी बसचा भीषण अपघात; 30 जण जखमी, 14 जण गंभीर

by nagesh
 ST Bus Accident | latur pune msrtc bus accident photos

लातूर : सरकारसत्ता ऑनलाईन – निलंगा आगाराच्या (Nilanga Bus Depot) लातूर-पुणे-वल्लभनगर (Latur-Pune-Vallabhanagar) एसटी बसचा (ST Bus Accident) बोरगाव काळे परिसरात भीषण अपघात झाला. हा अपघात मंगळवारी (दि.17) सकाळी झाला असून यामध्ये 30 प्रवाशी जखमी झाले आहेत. यापैकी 14 प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने लातूर येथे हलवण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार अपघातात (ST Bus Accident) जीवितहानी झाली नसली तरी जखमींची संख्या जास्त आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आज सकाळी निलंगा आगाराची बस पुण्याच्या दिशेने येत होती. त्यावेळी चालकाचे एसटी वरील नियंत्रण सुटल्याने मुरुड जवळील बोरगाव काळे येथील पुलावरून बस खाली उतरली. ही बस जोरात आदळल्याने (ST Bus Accident) बसमधील प्रवासी एकमेकांवर जोरात आदळले. तसेच बसची पुढील काच फुटली. पुलावरून बस कोसळताच बसचा पुढील भाग चक्काचूर झाला. या अपघातात ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले जखमी झाली आहेत.

 

एसटी बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटल्याने चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले आणि बस मातीच्या ढिगाऱ्यावर
जाऊन आदळली. बसचा समोरील भाग जोरात आदळल्याने बस चालक गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने 108 नंबरवर फोन करुन रुग्णवाहिका बोलावून
घेत जखमींना रुग्णालयात हलवले. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
पोलिसांनी अपघातग्रस्त बस बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- ST Bus Accident | latur pune msrtc bus accident photos

 

हे देखील वाचा :

G-20 Summit In Pune | खा. वंदना चव्हाण यांचा जी 20 परिषदेवर आक्षेप, म्हणाल्या…

Pune Police | आयुष्य घडवण्यासाठी ध्येय ठरवणे गरजेचे, गुन्हे शाखेकडून अल्पवयीन मुलांचे समुपदेशन

Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून संजय राऊत यांनी सरकारला फटकारले; म्हणाले…

 

Related Posts