IMPIMP

Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून संजय राऊत यांनी सरकारला फटकारले; म्हणाले…

by nagesh
 Sanjay Raut | sanjay raut criticized shinde government on davos visit

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Raut | दावोस, स्वित्झर्लंड येथे सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांच्या परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी आनंददायी बातमी आल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. सुमारे ४५९०० कोटी रूपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. आज (दि. १७) ते मुंबई येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, ‘ही गुंतवणूक महाराष्ट्रात खरोखरच येणार असेल, तर त्याचे स्वागतच केलं पाहिजे. मात्र, त्यापेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे अडीच लाख कोटींची गुंतवणूक डोळ्यासमोरून निघून गेली. तेव्हा ती रोखण्यासाठी ना मुख्यमंत्र्यांनी काही प्रयत्न केले, नाही उद्योग मंत्र्यांनी. आता दावोसमध्ये जागतिक गुंतवणूकदारांची जत्रा भरते आहे. त्यातून सव्वा लाख कोटींची गुंतणूक येणार आहे. म्हणतात, ती आली की आम्ही त्यावर बोलू. ते उद्योग इथे येतील, लोकांना रोजगार मिळेल. तेव्हाच त्यावर बोलणं योग्य ठरेल.’ असे संजय राऊत म्हणाले.

 

आज (दि.१७) निवडणूक आयोगासमोर शिवसेना पक्षाबाबत सुनावणी होणार आहे.
त्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रश्न विचारला असता.
ते म्हणाले, ‘शिवसेना कोणाची हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगासमोर उपस्थित होऊ शकतो.
मात्र, शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित होऊ शकत नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी आहे. शिवसेना एकच आहे.’
असे देखील संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

 

नुकतच काही दिवसांपूर्वी आपल्या ट्वीटरवरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपण भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबाबतचे एक ट्वीट केले होते. यावेळी बोलताना त्यांनी याबाबत देखील भाष्य केले.
संजय राऊत म्हणाले, ‘३० जानेवारी रोजी होणाऱ्या भारत जोडो यात्रेच्या समारोपासाठी मी जम्मू काश्मीरमध्ये जाणार
आहे. यावेळी तेथील शिख समाज आणि काश्मीरी पंडीतांची देखील भेट घेणार आहे.’
असे यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, शिवसेना कुणाची यावर आज निवडणुक आयोगापुढे सुनावणी होणार आहे.
त्यामुळे राज्यातील राजकीय मंडळींची नजर आजच्या निवडणुक आयोगातील सुनावणीकडे असणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut criticized shinde government on davos visit

 

हे देखील वाचा :

Union Budget 2023 | यंदाच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांसाठी आनंदाची बातमी; अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे सुतोवाच

Pune Crime News | सेलिब्रिटीच्या ओळखी सांगत 30 कोटींच्या फंडिंगचे आमिष दाखवून घातला दीड कोटीला गंडा; लोणीकंद पोलीस ठाण्यात FIR

Ahmednagar Crime News | श्रीरामपूर शहरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी डॉ. विजय मकासरे यांच्या विरुद्ध दाखल केलेला गुन्हा हायकोर्टाकडून रद्द; खोटा गुन्हा दाखल केल्यावरून डॉ. मकासरे करणार अब्रुनुकसानीचा आणि मानहानीचा दावा

 

Related Posts