IMPIMP

Supreme Court | महाराष्ट्र भाजपला झटका ! 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, पुढील सुनावणी 11 जानेवारीला

by nagesh
Supreme Court | army not being fair to women officers says supreme court in hearing on women officers pil regarding promotion

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात भाजपला (Maharashtra BJP) मोठा झटका बसला आहे. विधानसभेच्या 12 आमदारांचे निलंबन (12 MLA Suspension) रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नकार दिला आहे. आमदारांच्या निलंबनाच्या विधानसभेच्या ठरावाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नकार दिला आहे. आता या प्रकरणी 11 जानेवारीला सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (rainy session) गदारोळ आणि गोंधळ घातल्याने भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले होते. यानंतर निलंबित आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या अखेरीस होत आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) निलंबनाला स्थगिती देण्यास नकार दिल्याने निलंबित आमदारांना हिवाळी अधीवेशनात सहभागी होता येणार नाही. राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत होणार आहे.

 

काय आहे प्रकरण?

पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे (NCP) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा (OBC reservation) ठराव मांडला.
मात्र, बोलू दिलं नाही म्हणून भाजपच्या आमदारांनी जोरदार गदारोळ केला.
एवढंच नाही तर सभापती भास्कर जाधव (Speaker Bhaskar Jadhav) यांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी करत त्यांना धक्काबुक्की केल्याचे समोर आले.
त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), अजित पवार (Ajit Pawar),
अनिल परब (Anil Parab) यांची बैठक पार पडली. सभागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

Web Title :- Supreme Court | supreme court refuse to revoke suspension of 12 mla of maharashtra bjp

 

हे देखील वाचा :

आणखी सुरक्षित होईल WhatsApp ! अनोळखी लोक पाहू शकणार नाहीत स्टेटस, लास्ट सीन; नवी फीचरवर सुरू

Small Savings Accounts | आर्थिक वर्ष 2019-20 नंतर स्मॉल सेविंग अकाऊंट्स उघडण्याचे प्रमाण घटले, पाहा आकडेवारी

Chandrakant Patil | भाजपमध्ये जे-जे संयम ठेवतात त्यांना ‘सब्र का फल मीठा है’ याचा अनुभव येतो – चंद्रकांत पाटील

 

Related Posts