IMPIMP

Surraj Gurukul | कलाकारांसाठी ‘नेतृत्व गुण आणि टीमवर्क’ कार्यशाळा संपन्न

by nagesh
Surraj Gurukul | Conducted ‘Leadership Qualities and Teamwork’ Workshop for Artists Rita India Foundation Dr. Rita Shetiya

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Surraj Gurukul | सूरराज गुरुकुल यांच्या तर्फे कलाकारांसाठी चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विशेषतः कलाकारांसाठी शास्त्रीय आणि सुगम संगीत बरोबरच इतर आवश्यक आणि तितक्याच महत्वाच्या विषयावर म्हणजेच ‘नेतृत्व गुण आणि टीमवर्क’ यावर ही मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. (Surraj Gurukul)

रिता इंडिया फाउंडेशनच्या (Rita India Foundation) संस्थापिका डॉ. रिता शेटीया (Dr. Rita Shetiya) यांनी या विषयावर ध्वनिफीत, गेम्स आणि काही ॲक्टिविटीच्या सहायाने नेतृत्व गुण आणि टीम वर्क कोणत्याही क्षेत्रात किती उपयुक्त आहे याचे सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये नेतृत्व गुण , महत्व आणि त्याचे प्रकार ‘फन आणि लर्न’ च्या सहायाने घेण्यात आले. (Surraj Gurukul)

या कार्यशाळेचा लाभ एकूण २७ शिबीराथी नी घेतला . यात १० ते ८० वयोगटातील शिबीराथी नी सहभाग घेतला. सूरराज गुरुकुल च्या संस्थापिका मेघना भावे – देसाई धनंजय देशपांडे आणि केदार भावे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

कार्यशाळेचा लाभ घेतलेल्या कल्याणच्या श्वेता अगीवले म्हणाल्या, मी हा विचारच केला नव्हता की नेतृत्व
या विषयावर कार्यशाळा होऊ शकते. मी जे कार्य करत आहे ते नेतृत्वाच्या अंतर्गत येते हे मला कार्यशाळेमुळे समजले.

लोणावळ्या ची आठवी इयतेत शिकणारी मृण्मयी म्हणाली , मला भविष्यात नक्कीच या कार्यशाळेचा उपयोग होईल.
आपल्यात हे गुण आहेत हे मला कळले.

पुण्याची देविका देशपांडे म्हणाली, ‘फन अँड लर्न’ ॲक्टीविटीमधून टीम वर्क आणि नेतृत्व गुण याविषयी चे योग्य ज्ञान आम्हाला झाले.

Web Title : Surraj Gurukul | Conducted ‘Leadership Qualities and Teamwork’ Workshop for Artists Rita India Foundation Dr. Rita Shetiya

Related Posts