IMPIMP

Uddhav Thackeray Maval Sabha | पुण्यात बोलताना मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आक्रमक, गुजराती कंपन्यांना इशारा, ”महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर…”

by sachinsitapure

पुणे : Uddhav Thackeray Maval Sabha | सरसकट गुजरातींबद्दल माझ्या मनात आकस नाही. मी फक्त त्यांनाच सांगतो, खासकरुन या मानसिकतेचे जे लोक आहेत त्यांना सांगतोय, महाराष्ट्रात जर तुमची कंपनी उघडी ठेवायची असेल तर मराठी माणसाला नोकरी द्यावी लागेल. नाही तर तुमचंसुद्धा शटर आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांचा द्वेष करणाऱ्या गुजराती कंपन्यांना दिला आहे. ते मावळ येथील प्रचारसभेत बोलत होते.

एका गुजराती कंपनीने दिलेल्या जाहिरातीमध्ये मराठी लोकांना येथे स्थान नाही असे म्हटले होते, यामुळे स्थानिक परप्रांतिय वाद चिघळला आहे. संबंधित कंपनीच्या एचआरने माफी मागितली असली तरी या प्रकाराचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटत आहेत. या प्रकरणाची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील सगळे उद्योगधंदे गुजरातला घेऊन गेलात. हिरेव्यापार घेऊन गेलात. म्हणून मी तुम्हाला वचन दिले आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा उद्योगधंदे उभारु. लुटलेले वैभव पुन्हा उभा करू. दोन दिवसापूर्वी मुंबईत एक जाहीरात आली, ती गुजराती कंपनी आहे. ऑनलाईन जाहीरात काढली, यात मराठी माणसांना प्रवेश नाही असे लिहिले होते, यावरून उद्धव ठाकरे यांनी गुजराती कंपन्यांना इशारा दिला.

Pune Crime News | पिस्टल बाळगणारा अल्पवयीन मुलगा भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात; पिस्टल व काडतुसे जप्त

Related Posts