IMPIMP

T-20 World Cup | T-20 वर्ल्डकप आधी ICC ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, 1 ऑक्टोबरपासून होणार लागू

by nagesh
T20 World Cup 2024 | t20 world cup 2024 next mens t20 world cup to be in played in new format 20 team participate

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  –  T-20 World Cup | T-20 वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने म्हणजेच आयसीसीने काही  मोठे  निर्णय घेतले आहेत. 1 ऑक्टोबर 2022 पासून क्रिकेटमध्ये हे सगळे नियम लागू करण्यात येणार आहेत. या बदललेल्या नियमांसह टी-20 वर्ल्डकप 2022 खेळवण्यात येणार आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात पुरुष क्रिकेट समितीच्या शिफारशींना दुजोरा मिळाल्यानंतर नियमांमध्ये हे बदल करण्यात आले.चला तर जाणून घेऊया हे नेमके नियम काय आहेत ते. (T-20 World Cup)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

1) कॅच आऊट झाल्यास हा खेळाडू करणार फलंदाजी

आयसीसीच्या नव्या नियमांनुसार जर एखादा खेळाडू झेलबाद झाला तर नवीन फलंदाज पुढचा बॉल खेळणार आहे. याअगोदर जेव्हा एखादा फलंदाज झेलबाद होतो तेव्हा नॉन स्ट्रायकरवरचा फलंदाज पुढचा बॉल खेळत होता.

 

 

2) बॉलला थुंकी लावण्यास बंदी

चेंडूला चमक देण्यासाठी लाळेचा वापर करण्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन वर्षांहून अधिक काळ बंदी घालण्यात आली आहे. कोरोना महामारीनंतर सुरक्षेच्या दृष्टीने ते आणण्यात आले होते. मात्र आता ते कायमस्वरूपी लागू करण्यात आले आहे. (T-20 World Cup)

 

 

3) 2 मिनिटांत खेळाडूला व्हावे लागेल तयार

फलंदाजाला आता फलंदाजीसाठी कसोटी आणि वनडे सामन्यांत दोन मिनिटाच्या आत स्ट्राईक घेण्यासाठी तयार व्हावे लागणार आहे.
टी-20 फॉरमॅटसाठी हा वेळ 90 सेकंदाचा असणार आहे.

 

 

4) फिल्डरच्या चुकीच्या वर्तणुकीची मिळणार शिक्षा

जर फिल्डिंगच्या वेळेस खेळाडू जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीची वर्तणूक करत असेल तर फलंदाजाला पाच रन पेनल्टी म्हणून देण्यात येतील.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

5) फलंदाज पिचवरूनही मारू शकतो बॉल

एखादा बॉल जर पिचपेक्षा दूर जात असेल तर फलंदाजाला पिचवरच राहावे लागेल.
जर एखादा फलंदाज पिचच्या बाहेर निघत असेल तर अंपायर त्याला डेड बॉल घोषित करेल.

 

 

6) वनडेमध्ये लागू होणार स्लो ओव्हर रेट नियम

स्लो ओव्हर रेटचा नियम जानेवारी 2022मध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये लागू करण्यात आला होता.
यात स्लो ओव्हर रेट पाहता संघांवर दंड ठोठावला जात होता आता हा नियम वनडेमध्येदेखील लागू करण्यात येणार आहे.

 

 

Web Title :- T-20 World Cup | ICC change rules before t-20 world cup

 

हे देखील वाचा :

Pune Crime | टोळक्याने दुकानात घुसून तोडफोड करीत पसरविली दहशत; वाकड येथील भूमकर चौकात घातला राडा

Pune Crime | पुण्यात MPSC चा अभ्यास करणार्‍या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Kolhapur Crime | नातेवाईकांच्या WhatsApp वर ‘गुडबाय’ मेसेज टाकून तरुणीचा केला खून; तरुणाने विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न, कोल्हापूरातील धक्कादायक घटना

 

Related Posts