IMPIMP

Temperature in Maharashtra | महाराष्ट्रात 2 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

by nagesh
Maharashtra Weather Update | temperature may goes high in maharashtra heat will increase in vidarbha

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Temperature in Maharashtra | राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका लागला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे माणसाच्या जीवाची काहिली झाली आहे. विदर्भ (Vidarbha), मराठवाड्यासह (Marathwada) मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) तापमानाचा (Temperature in Maharashtra) पारा 40 च्या नजदीक आला आहे. याचा परिणाम म्हणजे आगामी 2 एप्रिलपर्यंत राज्यात उष्णतेची लाट पसरणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून Indian Meteorological Department (IMD) देण्यात आली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मार्च महिन्यामध्ये 21 ते 24 मार्च आणि 29 ते 2 एप्रिल पर्यंतच्या कालावधीत 2 उष्णतेच्या लाटा नोंदवल्या गेल्या आहेत. आजपासून (बुधवार) महाराष्ट्रात पुन्हा उष्णतेच्या लाटेने डोकं वर काढलं आहे. बुधवारीच मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात तापमान 40 अंशांच्या आसपास होते. दरम्यान, मुंबईमध्ये (Mumbai) तापमानाचा पारा कमी असला तरी उकाड्याने नागरीकांची दैना झाली आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये (Nashik) उष्ण वारा वाहू लागला आहे. (Temperature in Maharashtra)

 

 

हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानूसार, जळगाव, नाशिक जिल्ह्यात 30 मार्च, 1 आणि 2 एप्रिल रोजी उष्णतेची लाट तीव्र असेल. तसेच, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि अकोला या जिल्ह्यात 30 व 31 मार्च आणि 1,2 एप्रिल अमरावती, बुलढाणा, 30 आणि 31 मार्च, चंद्रपूर जिल्ह्यात 31 मार्च तर, नागपूर जिल्ह्यात 30 मार्च रोजी उष्णतेची लाट सर्वाधिक सक्रीय असेल.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, सोमवारपासून विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान वाढ जादा जाणवू लागली आहे.
काल (मंगळवारी) विदर्भ विभागात चंद्रपूरात 43.4 अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली आहे.
त्याचबरोबर अकोला येथे 43.1 अंश सेल्सिअस कमाल तापमान होते.
गडचिरोली वगळता अन्य सर्वच केंद्रांवर पारा 40 अंशाच्या आसपास पोहोचला होता.
तर, मराठवाड्यात देखील परभणी, नांदेड या दोन्ही केंद्रांवर 41 अंशांहून जादा कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे.

 

Web Title :- Temperature in Maharashtra | weather alert heatwave in several states for next 5 days predicts imd

 

हे देखील वाचा :

Datura Leaves Benefits | ‘या’ पानांचा वापर केल्याने गळणार नाहीत डोक्याचे केस, कुठेही दिसली तर तोडून आणा घरी; जाणून घ्या

Bank Scams In India | देशात सर्वाधिक बँक घोटाळे महाराष्ट्रात; रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून माहिती उघड

Pune Katraj LPG Gas Cylinder Blast | कात्रज सिलेंडर स्फोट प्रकरणात जागा मालकासह 4 जणांवर FIR, एकाला अटक

Pune Municipal Corporation (PMC) | धानोरीतील घटनेनंतर पुणे महापालिका अतिक्रमण विभागाने घेतला मोठा निर्णय

 

Related Posts