IMPIMP

Pune Katraj LPG Gas Cylinder Blast | कात्रज सिलेंडर स्फोट प्रकरणात जागा मालकासह 4 जणांवर FIR, एकाला अटक

by nagesh
Pune Katraj LPG Gas Cylinder Blast | FIR against 4 persons including landlord in Katraj cylinder blast case one arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Katraj LPG Gas Cylinder Blast | पुण्यातील कात्रज (Katraj, Pune) परिसर काल सायंकाळी सिलेंडरच्या स्फोटांनी हादरुन गेला. तब्बल 22 सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही. कात्रज सिलेंडर स्फोट प्रकरणात (Pune Katraj LPG Gas Cylinder Blast) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) जागा मालकासह 4 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली आहे.
धक्कादायक म्हणजे याठिकाणी अनधिकृतरित्या (Unauthorized) सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला.
141 लहान तर 26 मोठे सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत.
ही घटना कात्रज येथील अंजलीनगर येथील सुधामाता मंदिराच्या पाठीमागे पाचच्या सुमारास घडली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सागर संदीप पाटील Sagar Sandeep Patil (रा. सुधामाता मंदिराच्या पाठीमागे, अंजलीनगर, कात्रज), सोनु मांगडे (Sonu Mangde), संपत सावंत (Sampat Sawant), जागा मालक दत्तात्रय काळे (Dattatraya Kale) यांच्यावर भादवि 285, 308, 435, 436, 336, 34, जिवनावश्यक अधिनियम 3,7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यावसायिक सागर पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश खंडू काळ Ganesh Khandu Kaal (वय-25) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Katraj LPG Gas Cylinder Blast)

 

मंगळवारी सायंकाळी कात्रज येथील सुधामाता मंदिर परिसरात एका पाठोपाठ 22 सिलेंडरचा स्फोट झाले.
सिलिंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला (Gas Refilling) जात असताना हे स्फोट झाले.
या स्फोटाच्या आवाजाने परिसरात आगीच्या ज्वाळा उसळत होत्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Pune Fire Brigade) पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर 8 गाड्यांद्वारे आग आटोक्यात आणली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Inspector of Police Jagannath Kalaskar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधामाता मंदिर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या सिलिंडरमधून छोट्या पाच किलोच्या सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचे काम अवैधपणे सुरु होते.
पण सिलेंडर भरत असताना अचानक सिलिंडरमधून गॅस गळती होऊ लागली.
गॅस गळतीमुळेच हे स्फोट झाले असण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरुन 16 रिकामे आणि आठ भरलेले मोठे सिलिंडर जप्त केले आहेत.

 

या घटनेत गोडावून, दोन चारचाकी वाहने जळाली आहेत.
हे स्फोट एवढे भयंकर होते की तेथून काही अंतरावर असलेल्या एका घरावरील पाण्याची टाकी फुटलेल्या सिलिंडरचा तुकडा लागल्याने फुटली.
स्फोटांच्या आवाजाने एका घराच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या.
स्फोटांच्या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरातील मुलांमध्ये घबराहट पसरली होती. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Katraj LPG Gas Cylinder Blast | FIR against 4 persons including landlord in Katraj cylinder blast case one arrested

 

हे देखील वाचा :

Pune Municipal Corporation (PMC) | धानोरीतील घटनेनंतर पुणे महापालिका अतिक्रमण विभागाने घेतला मोठा निर्णय

Pune Crime | ऑस्ट्रेलियात नोकरीच्या आमिषाने तरुणांची 6 लाखांची फसवणूक ! जे एस सी ओव्हरसीज कन्सलटंटच्या संचालकावर गुन्हा दाखल

Best Position To Sleep | झोपण्याची योग्य पद्धत ठरते आरोग्यासाठी फायदेशीर, पाठीचे दुखणे आणि घोरणे होते कमी; जाणून घ्या

 

Related Posts