IMPIMP

Tips For Buying Cucumber | काकडी कडू आहे कि गोड असे ओळखा, या टिप्सने तोबडतोब दूर होईल Cucumber चा कडूपणा

by nagesh
Tips For Buying Cucumber | hacks to buy sweet cucumber from market tips to remove bitterness

सरकारसत्ता ऑनलाइन – Tips For Buying Cucumber | सध्या उन्हाळा सुरू आहे. या ऋतूत आपण सर्वांनी खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. या ऋतूत जास्त तळलेले पदार्थ खाऊ नका. याशिवाय शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. शरीराला हायड्रेट (Hydrate)  ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि अशी फळे खा ज्यामध्ये भरपूर पाणी असेल (Foods For Summer). कोणत्याही स्थितीत फळे ही प्रत्येक ऋतूत आपल्यासाठी फायदेशीर असतात, परंतु उन्हाळ्यात आपण अशी फळे खावीत ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते (Tips For Buying Cucumber).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

फळे खरेदी करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की ती केवळ तुमच्या आरोग्यासाठी चांगली नव्हे तर स्वादिष्ट देखील असावीत. काकडी, खरबूज-कलिंगड ही फळे उन्हाळ्यात येतात आणि त्यात पाण्याचे प्रमाणही जास्त असते. आज आपण काकड्यांबद्दल जाणून घेणार आहोत (Tips For Buying Cucumber)…

 

यामुळे तुम्हाला चांगली काकडी (Cucumber) खरेदी करता येईल. आज आम्ही तुम्हाला येथे काही टिप्स देणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही चांगली काकडी विकत घेऊ शकता आणि काकडीचा कडूपणा कसा दूर करावा हे देखील समजेल (Tips For Choosing The Best Cucumbers).

 

काकडीचा आकार पाहून खरेदी करा (Buy Cucumber By Size)
बाजारात अनेक प्रकारच्या काकड्या उपलब्ध असतात हे तुम्ही पाहिलेच असेल. लहान-मोठ्या, जाड, वाकड्या अशा सर्व प्रकारच्या काकड्या बाजारात उपलब्ध आहेत. परंतु खूप मोड्या काकड्या खरेदी करू नका. लहान आणि मध्यम आकाराची काकडी निवडा. तसेच काकडी जास्त पातळ नसावी आणि जाडही नसावी हे लक्षात ठेवा. ताजी काकडी कडक असते, जी दाबल्यावर दबत नाही. काकडी फिकट पिवळी असेल तर ती शिळी असते म्हणून घेऊ नका.

 

खूप मऊ काकडी खरेदी करू नका (Don’t Buy Too Soft Cucumber)
काकडी घेताना ती खूप मऊ नाही ना हे पहा. मऊ काकडीत जास्त बिया असू शकतात. काकडी जास्त पिकल्यावर अशी होते. त्यामुळे बाजारातून कडक काकडी विकत घ्यावी. यासाठी तुम्ही काकडी दाबून बघा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

साल पहा मग खरेदी करा (See The Peels Then Buy)
देशी काकडी खूप चवीला असते. बाजारात काकडी खरेदी करताना तिच्या सालीकडे लक्ष दिले पाहिजे. जर काकडीची साल काही ठिकाणी गडद हिरवी आणि पिवळसर असेल आणि वर थोडी खडबडीत असेल तर ती देशी काकडी आहे. काकडीचे अनेक प्रकार बाजारात असतात.

 

अजिबात खरेदी करू नका अशी काकडी (Do Not Buy Such A Cucumber At All)
चिर गेलेली आणि वाकडी काकडी खरेदी करू नका. तसेच काकडीवर हिरव्या रेषा दिसत असतील ती देशी काकडी नाही.

 

काकडीचा कडवटपणा असा करा दूर (Remove The Bitterness Of Cucumber Like This)
काकडी कापण्यापूर्वी काकडीचा वरचा भाग थोडासा कापा आणि कापलेल्या भागावर मीठ लावून थोडेसे चोळा. असे केल्याने काकडीचा कडूपणा फेसातून बाहेर येतो.

काकडी हे केवळ स्वस्त फळ नाही तर चवदार आणि आरोग्यदायी देखील आहे
(Cucumber Is Beneficial For Health). प्रत्येक हंगामात तुम्हाला काकडी मिळते.
पण चांगली आणि देशी काकडी उन्हाळ्यातच येते. विशेषतः मार्च ते जून या महिन्यांत.
सध्या असलेल्या उष्णतेमुळे चांगल्या आणि गोड काकडीचे उत्पादन चांगले आले आहे.
ती खरेदी करताना काळजी घ्या, नाहीतर चांगली काकडी मिळणार नाही. देशी काकड्या गोड लागतात.
तर मोठ्या किंवा लहान काकड्या कडू असू शकतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Tips For Buying Cucumber | hacks to buy sweet cucumber from market tips to remove bitterness

 

हे देखील वाचा :

Kasara Ghat Accident | घाट उतरत असताना क्रूझरचा अपघात; एका मुलीचा मृत्यू तर 7 जण जखमी

Dr. Neelam Gorhe on Raj Thackeray | ‘राज ठाकरे यांचा राजकीय गेम होईल’ – डॉ. नीलम गोऱ्हे

Pune Crime | कौटुंबिक छळातून विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांना विमानतळ पोलिसांनी केली अटक

 

Related Posts