IMPIMP

TV Actress Vaishali Thakkar Suicide Case | वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणात राहुल नवलानीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

by nagesh
TV Actress Vaishali Thakkar Suicide Case | court passed important order in vaishali takkar suicide case

इंदौर : वृत्तसंस्था – हिंदी टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करने (TV Actress Vaishali Thakkar Suicide Case) अचानक आत्महत्या केल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. वैशालीने आत्महत्या एक सुसाईड नोट (Suicide Note) देखील लिहिली होती. यामध्ये तिने अनेक खुलासे केले होते. तसेच तिने या सुसाईड नोटमध्ये आपल्या आत्महत्येला (TV Actress Vaishali Thakkar Suicide Case) जबाबदार असणाऱ्या लोकांची नावे टाकून त्यांना शिक्षा देण्याचीही मागणी केली. तसेच तिने सुसाईड नोटमध्ये तिच्या शेजारी असलेल्या राहुल नवलानी (Rahul Navalani) याला शिक्षा द्यावी, ही विनंती देखील केली. वैशाली ठक्करने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर राहुल नवलानी हा फरार झाला होता.

 

वैशाली ठक्करने राहुल नवलानीवरती अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यामुळे पोलीस गेल्या काही दिवसांपासून राहुलचा शोध घेत होते. यानंतर पोलिसांनी राहुलचा शोध लावून त्याला अटक (Arrest) केली. त्याला न्यायायलात हजर केले असता न्यायालयाने राहुलला रिमांडवर पाठवले. राहुल नवलानीला इंदूर पोलिसांकडून (Indore Police) अटक करण्यात आली आहे. पोलिसांना राहुलची रिमांड 10 दिवस हवी होती. मात्र, कोर्टाने राहुलला चार दिवसांसाठी रिमांडवर पाठवले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रविवारी 16 ऑक्टोबर 2022 ला वैशाली ठक्कर हिनं इंदौर इथं राहत्या घरी आत्महत्या केली.
तिच्या खोलीतून डायरी आणि पाच पानांचं पत्र लिहिलेलं आढळून आलं.
अभिनेत्रीनं तिच्या चिठ्ठीमध्ये आई-वडिलांची आणि होणाऱ्या नवऱ्याची मितेशची माफी मागितली आहे.
तिनं या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे की, तिचा एक्स बॉयफ्रेंड राहुल हा अडीच वर्षांपासून त्रास देत आहे.

 

Web Title :- TV Actress Vaishali Thakkar Suicide Case | court passed important order in vaishali takkar suicide case

 

हे देखील वाचा :

T20 World Cup 2022 | बीसीसीआयच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी पदभार स्वीकारताच बुमराहबाबत केले ‘हे’ मोठे वक्तव्य

Gold Rate Today | ‘सुवर्ण’संधी! दिवाळीत खरेदी करा स्वस्त दरात सोने-चांदी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

 

Related Posts