IMPIMP

Udayanraje Bhosale | दम असेल तर समोर या…तुम्हाला बघून घेतो, उदयनराजेंनी व्यक्त केला संताप

by nagesh
Udayanraje Bhosale | udayanraje bhosale vs governor koshyari pm modi denied visit to udayanraje

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन Udayanraje Bhosale | दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये (Mumbai) काल शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट (Shinde Group) यांच्यात जोरदार संघर्ष पहायला मिळाला. यादरम्यान साताऱ्यातही (Satara) राजकीय वातावरण तापलं आहे. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) विरुद्ध आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांच्यातील वाद साताऱ्यातील जनतेला काही नवीन नाही आहे. त्यामध्ये आता एका नवीन वादाची भर पडण्याची शक्यता आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे प्रकरण ?

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या समर्थक आणि नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा दिपाली गोडसे (Deepali Godse) यांना एका नगरसेवकाकडून मारहाण (Beating) करण्यात आली. हा नगरसेवक शिवेंद्रराजेंचा समर्थक असल्याचे समजत आहे. या घटनेनंतर उदयनराजे भोसले आक्रमक झाले असून ‘दम असेल तर समोर या, तुम्हाला बघून घेतो,’ असा शब्दांत संताप व्यक्त करत आव्हान दिले आहे. या मारहाणीप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात (Shahupuri Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हल्लेखोरांवर कारवाई झाली पाहिजे

‘ज्या साताऱ्यामध्ये अनेक चळवळी सुरू झाल्या, अन्यायाविरुद्ध पत्री सरकारची चळवळ सुरू झाली,
स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली अशा या जिल्ह्यात दसऱ्याच्या दिवशीच एका महिलेला मारहाण झाली.
एखाद्या स्त्रीला चप्पलेने मारलं जातं, धक्काबुक्की केली जाते, याला काय म्हणायचं?
एका लोकप्रतिनिधीकडून असा घृणास्पद प्रकार केला जात असेल तर त्या हल्लेखोरांवर कडक कारवाई झाली पाहिजे,’
अशी मागणीसुद्धा उदयनराजे यांनी यावेळी केली.

 

 

Web Title :- Udayanraje Bhosale | udayanraje bhosale became aggressive after the dipali godse was beaten up

 

हे देखील वाचा :

Dasara Melava 2022 | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील ठाकरेंच्या भाषणावर मनसेची टीका; म्हणाले – ‘विचार ही नाही आणि…’

Facing Acne Problem | मुरुमांच्या समस्येला सहजतेने घेऊ नका, आरोग्याच्या ‘या’ 5 गडबडीचा आहे संकेत

Pune Cyber Crime | सोशल मीडियावर ओळखीतून ज्येष्ठ महिलेला ५७ लाखांचा गंडा

 

Related Posts