IMPIMP

Dasara Melava 2022 | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील ठाकरेंच्या भाषणावर मनसेची टीका; म्हणाले – ‘विचार ही नाही आणि…’

by nagesh
Dasara Melava 2022 | dasara melava 2022 mns first comment on uddhav thackeray rally at shivaji park

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेचा (Shivsena) पारंपारिक दसरा मेळावा (Dasara Melava 2022) काल शिवतीर्थावर (Shivtirtha) पार पडला. तर बीकेसीवर बंडखोर शिंदे गटाचा (Shinde Group) मेळावा झाला. आता या मेळाव्यातील (Dasara Melava 2022) भाषणांवर विविध पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena (MNS) नेहमीप्रमाणे शिंदे गट आणि भाजपाला (BJP) अनुकूल प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणावर टीका केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर (Dasara Melava 2022) टीका करताना माजी नजरसेवक संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील अनेक मुद्दे हे नळावरील भांडणाप्रमाणे होते उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामधून उणीधुणी काढली आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, नुसतीच ‘उणी’ ‘धुणी’ ‘नळ’ आणि ‘भांडण’; विचार ही नाही आणि सोनं ही नाही.

 

दरम्यान एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे कौतूक केले आहे. तसेच शिंदे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज बारामतीमध्ये म्हटले की, आवडी निवडीसाठी ही भाषणे नव्हती. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) शिवसेनेची स्थापना केल्यापासून विचार ऐकण्यासाठी दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर शिवसैनिक (Shiv Sainik) शिवाजी पार्कात (Shivaji Park) येत होते. आता पिढ्या बदलल्या असून त्यांचे विचार ऐकण्यासाठी येत आहेत.

 

पवार पुढे म्हणाले की, एसटीला 10 कोटी रुपये देऊन लोकांची व्यवस्था करण्यात आली होती.
मला काहींनी बसेस तिथे गेल्याने सणाच्या दिवशी इतर सर्वसामान्य प्रवाशांची अडचण झाल्याचे सांगितले.
अशा गोष्टी करता कामा नये. पण काही भाषणे फारच लांबली, नको तिथे लांबली. आता ती कोणती ते तुम्हीच ठरवा.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Dasara Melava 2022 | dasara melava 2022 mns first comment on uddhav thackeray rally at shivaji park

 

हे देखील वाचा :

Facing Acne Problem | मुरुमांच्या समस्येला सहजतेने घेऊ नका, आरोग्याच्या ‘या’ 5 गडबडीचा आहे संकेत

Diabetes – High Blood Sugar Level | डायबिटीजच्या रूग्णांमध्ये पपई खाल्ल्याने वाढू शकते का ब्लड शुगर? जाणून घ्या काय आहे सत्य

Pune Cyber Crime | सोशल मीडियावर ओळखीतून ज्येष्ठ महिलेला ५७ लाखांचा गंडा

 

Related Posts