IMPIMP

Upcoming IPO | तयार ठेवा पैसे ! येणार आहेत कमाईच्या 23 संधी, अदानीपासून बाबा रामदेव पर्यंतच्या कंपन्यांचे येणार आयपीओ

by nagesh
Tamilnad mercantile bank ipo opens next week check price band lot size and other details

नवी दिल्ली : वृत्त संस्था  –Upcoming IPO | चालू जानेवारी-मार्च तिमाहीतही आयपीओ बाजारात तेजी राहील. या तिमाहीत 23 कंपन्या आयपीओद्वारे 44,000 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत. मर्चंट बँकर्सनी ही माहिती दिली. तंत्रज्ञानावर आधारित कंपन्या आयपीओमधून निधी उभारण्यात आघाडीवर असतील. (Upcoming IPO)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

2021 मध्ये 63 कंपन्यांनी IPO तून जमा केले 1.2 लाख कोटी

यापूर्वी 2021 मध्ये 63 कंपन्यांनी आयपीओद्वारे 1.2 लाख कोटी रुपयांची विक्रमी रक्कम जमा केली होती. मात्र, या काळात महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. या कंपन्यांव्यतिरिक्त, POWERGRID INVIT ने IPO द्वारे 7,735 कोटी रुपये उभे केले, तर ब्रुकफील्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टने REIT (रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) द्वारे 3,800 कोटी रुपये उभे केले.

 

 

येत आहेत हे आयपीओ

मर्चंट बँकर्सनी सांगितले की, मार्च तिमाहीत ज्या कंपन्यांची आयपीओद्वारे निधी उभारण्याची अपेक्षा केली त्यामध्ये OYO (रु. 8,430 कोटी) आणि पुरवठा साखळीशी संबंधी कंपनी डेल्हिवेरी (रु. 7,460 कोटी) यांचा समावेश आहे.

याशिवाय अदानी विल्मर (रु. 4,500 कोटी), इमक्योर फार्मास्युटिकल्स (रु. 4,000 कोटी), वेदांत फॅशन्स (रु. 2,500 कोटी), पारादीप फॉस्फेट्स (2,200 कोटी), मेदांता (2,000 कोटी) आणि झिगो (800 कोटी रुपये) यांचे आयपीओ देखील तिमाही येण्याची शक्यता आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मर्चंट बँकर्स म्हटले की स्कॅनरे टेक्नॉलॉजीज, हेल्थियम मेडटेक आणि सहजानंद मेडिकल टेक्नॉलॉजीज देखील पुनरावलोकनाधीन तिमाहीत आयपीओ लाँच करू शकतात. ’रिकूर’ क्लबचे संस्थापक एकलव्य म्हणाले, कंपन्यांद्वारे आयपीओच्या माध्यमातून लोकांकडून भांडवल उभारण्यासाठी नोंदणी केली जाते, ज्यामुळे त्यांच्या शेयरची तरलता वाढते. (Upcoming IPO)

 

प्रतीक सिंग, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (LearnApp.com CEO) म्हणाले की, तंत्रज्ञान कंपन्यांना आता जागतिक स्तरावर विस्तार करायचा आहे आणि त्यासाठी त्यांना भांडवलाची गरज आहे. त्यामुळे त्या आयपीओच्या मार्गाने निधी उभारण्यास प्राधान्य देत आहेत.

 

 

 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | नैराशेतून हाताची नस कापून 23 वर्षाच्या तरुणाची तलावात उडी मारुन आत्महत्या

Gold Silver Price Today | खुशखबर ! आजही सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती; कोंढव्यातील घटना

 

Related Posts