Vasant More | पुण्यात मनसे नेते वसंत मोरे यांच्याकडे दुर्लक्ष केले जातेय का? राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेतील आसनावरून उद्भवला प्रश्न…

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Vasant More | राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यात त्यांनी विविध कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदवली आहे. आज ज्येष्ठ सिनेअभिनेते अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात एक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता त्यावेळी या कार्यक्रमास मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. यादरम्यान मनसेचे माजी पुणे शहर प्रमुख वसंत मोरे (Vasant More) यांना या कार्यक्रमात बसण्यास जागा न मिळाल्यामुळे त्यांनी तासभर हा कार्यक्रम उभा राहूनच पाहिला. त्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्याकडे मनसेत दुर्लक्ष केले जात आहे का? असा सवाल विचारला जातोय.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
पुण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनसेचे सर्व प्रमुख नेते हे पहिल्या रांगेत बसलेले दिसले. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांची देखील उपस्थिती होती. मात्र हा कार्यक्रम पहाण्यासाठी आलेल्या वसंत मोरे यांना तब्बल एक तास उभ्यानेच हा कार्यक्रम पहावा लागला. त्यांना कार्यक्रम संपेपर्यंत जागा मिळाली नाही. त्यामुळे वसंत मोरे (Vasant More) यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे का? असा सवाल पुण्याच्या राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
दरम्यान, त्यांचे शहरातील इतर मनसे पदाधिकाऱ्यांसोबत सतत खटके उडत असल्याची बाब समोर आली होती.
वसंत मोरे(Vasant More) यांनी शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची पक्षाबाबत नाराजी उघड
झाली होती. पण त्यावर पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना मुंबई येथे बोलावून त्यांची समजूत काढली होती.
त्यानंतर स्वतः वसंत मोरेंनी सर्व काही अलबेल असल्याचे सांगितले होते.
तसेच माझ्यात आणि पक्षात कुठलेही मतभेद नाहीयेत. असे स्पष्टीकरण दिले होते.
त्यातच त्यांना आज अक्षरशः उभं राहून हा कार्यक्रम पहावा लागला.
त्यामुळे मनसेतील गटबाजी पुन्हा एकदा समोर आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Vasant More | internal dispute in pune mns has come to the fore once again
Happy Birthday Farhan Akhtar | ‘या’ व्यक्तीमुळे फरहान अख्तरने ‘दिल चाहता है’ चित्रपट लिहिला होता
Jitendra Awhad | कायद्याचा दुरूपयोग झाल्यास कायदा हाती घेणार – जितेंद्र आव्हाड.
Comments are closed.