IMPIMP

Vasant More | ‘वसंत मोरे राष्ट्रवादीत येत असतील तर स्वागत’, मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर राष्ट्रवादीची ऑफर

by nagesh
Vasant More | how can i speak against muslim community vasant more asks mns chief raj thackeray

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनगुढी पाडव्यानिमित्त मुंबईतील (Mumbai) शिवतीर्थावर (Shivatirtha) झालेल्या मनसे (MNS) मेळाव्यात राज
ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या भाषणाचे पडसाद राज्यभर आणि मनसेतही उमटले आहेत. राज ठाकरेंनी मशिदींवरील (Mosque)
भोंग्याबाबत उपस्थित केलेल्या मुद्यांमुळे काही मनसैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये पुण्यातील मनसेचे (Pune MNS) वसंत मोरे (Vasant More) यांनी अडचण झाल्याचे सांगितले होते. यानंतर राज ठाकरे यांनी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांची पदावरुन हकालपट्टी करत नगरसेवक साईनाथ बाबर (MNS Sainath Babar) यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. पद काढून घेतल्यानंतर मोरे यांना राष्ट्रवादीकडून ऑफर देण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वसंत मोरे (Vasant More) हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) येत असतील तर त्यांचं पक्षात स्वागत आहे, असं राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Pune City President Prashant Jagtap) यांनी म्हटले आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी (Municipal Elections) वसंत मोरे पक्षांतराचा निर्णय घेणार का, अशी चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

 

वसंत मोरेंना मोठा धक्का
मशिदीवरील भोंगे हटवले नाहीत, तर तुम्हीही हनुमान चालिसेचं (Hanuman Chalisa) पठण करा, असा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र मला माझ्या प्रभागात शांतता ठेवायची आहे, असे म्हणत वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांचा आदेश धुडकावला होता. त्यामुळे नाराज झालेल्या राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईत बोलावून घेतले. यावेळी झालेल्या बैठकीत मनसेचे विद्यमान नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा मोरे यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुक जवळ आली आहे.
अशातच मनसेत झालेल्या उलथापालथामुळे पक्षाला या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.
कारण वसंत मोरे हे मागील 15 वर्षापासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. तसेच ते तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी काळात पुण्याच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी होतात, हे पहावं लागेल.

 

Web Title :- Vasant More | ncp offer to vasant more after mns removes him from the city president post

 

हे देखील वाचा :

Esha Gupta Superbold Photo | फोटोशूटसाठी पुन्हा बोल्ड झाली ईशा गुप्ता, डिपनेक ड्रेस घालून चाहत्यांना केलं घायाळ…!

EPFO | पीएफ धारकांच्या खात्यात गेल्या वर्षीचं व्याज लवकरच जमा होणार?; खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी जाणून घ्या सोपी पद्धत

Jackfruit | फणस खाल्ल्यानंतर ‘या’ 5 गोष्टी चुकूनही खाऊ नका, होऊ शकतो मोठा तोटा

 

Related Posts