IMPIMP

EPFO | पीएफ धारकांच्या खात्यात गेल्या वर्षीचं व्याज लवकरच जमा होणार?; खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी जाणून घ्या सोपी पद्धत

by nagesh
EPFO | epfo interest on pf account will come soon hoe to check your account balance

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन EPFO | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) पीएफवरील व्याजदर (PF Interest Rate) निश्चित करण्यात आलेय. यावेळी व्याजदर कमी केल्याने ग्राहकांना आता आधीपैक्षा कमी व्याज मिळणार आहे. दरम्यान, ग्राहकाच्या पीएफ खात्यामध्ये (PF Account) किती रक्कम जमा झाली आहे याबाबत जाणून घ्यायचे असेल त्यासाठी तुम्हाला SMS पाठवावा लागणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पीएफवरील व्याज चाळीस वर्षांतील सर्वात कमी झालेय. सन 2021 – 2022 साठी हा दर 8.1 टक्के निश्चित केला आहे. यामुळे EPFO च्या सुमारे 6 कोटी खातेधारकांना झटका बसला आहे. आता यानंतर जून महिन्यापर्यंत ग्राहकाच्या पीएफ खात्यामध्ये व्याजाचे पैसे येणे अपेक्षित आहे. या कारणामुळे पीएफ खात्यातील शिल्लक कोणत्या प्रकारे चेक करु शकता याबाबत जाणून घ्या. (EPFO)

 

एसएमएसद्वारे तपासू शकता शिल्लक –
EPFO कडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून EPFO UAN LAN (भाषा) 7738299899 वर पाठवावे लागणार आहे. LAN म्हणजे भाषा. इंग्रजीत माहिती हवी असल्यास LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. हिंदीत माहितीसाठी HIN  आणि तमिळसाठी  TAM लिहून SMS पाठवावा लागेल. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून SMS पाठवावा लागणार आहे.

 

मिस्ड कॉल द्वारे तपासा –
मिस्ड कॉलच्या (Missed Called) मदतीने तुम्ही तुमचा PF शिल्लकही तपासू शकणार आहे. यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011 – 22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल करावा लागणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वेबसाइटद्वारे तपासू शकता PF शिल्लक –
PF शिल्लक स्थिती ऑनलाइन तपासण्यासाठी एखाद्याला EPFO पासबुक पोर्टलला भेट द्यावी लागणार आहे. येथे तुम्हाला तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे लागणार आहे. यात पासबुक डाउनलोड/पहा वर क्लिक करा. यानंतर पासबुक तुमच्या समोर उघडेल. यामध्ये तुम्ही शिल्लक स्थिती पाहू शकता.

 

Umang अ‍ॅप –
Umang या अ‍ॅपद्वारे त्यांचे पीएफ शिल्लकही तपासू शकतात. यासाठी तुम्हाला उमंग अ‍ॅप ओपन करुन EPFO वर क्लिक करावे लागणार आहे.
यात Employee Centric Services वर क्लिक केल्यानंतर View Passbook वर जा आणि UAN आणि पासवर्ड टाका.
हे केल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल. त्यानंतर आपण शिल्लक तपासू शकणार आहे.

 

Web Title :- EPFO | epfo interest on pf account will come soon hoe to check your account balance

 

हे देखील वाचा :

Jackfruit | फणस खाल्ल्यानंतर ‘या’ 5 गोष्टी चुकूनही खाऊ नका, होऊ शकतो मोठा तोटा

Benefits Of Black Turmeric | काळी हळद आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी आहे अतिशय गुणकारी, होतात ‘हे’ आश्यर्यकारक 6 फायदे

Tejasswi Prakash Latest Photoshoot | तेजस्वी प्रकाशच्या लेटेस्ट फोटोशूटनं सोशल मीडियावर केला कहर, फोटोतील किलर लूकनं चाहते झाले घायाळ

 

Related Posts