IMPIMP

Vehicle Registration Certificate | कारचे RC हरवले असेल तर ‘नो-टेन्शन’? जाणून घ्या ‘डुप्लीकेट’ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तयार करण्याची ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत

by nagesh
Vehicle Registration Certificate | how to apply for duplicate rc in rto lost vehicle registration certificate

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Vehicle Registration Certificate | वाहनाचे पेपर्स हरवले तर मोठी समस्या निर्माण होते. परंतु आता तुमचे आरसी सारखे महत्वाचे कागदपत्र हरवले तरी चिंता करण्याची गरज नाही. असे झाल्यास RTO ऑफिसमधून डुप्लीकेट आरसी काढू शकता. हे काम ऑनलाइन आणि ऑफलाइन, दोन्ही पद्धतीने होऊ शकते. (Vehicle Registration Certificate)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

आवश्यक कागदपत्रे
फॉर्म 26 मध्ये अर्ज, पोलिसांचा दाखला आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच काही राज्यांमध्ये वैध विमा प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, व्यावसायिक वाहनांसाठी वाहतूक पोलीस आणि अंमलबजावणी विंग परिवहन विभागाकडून चलान मंजूरी, व्यावसायिक वाहनांत लेखा विभागाकडून कर भरणा, पॅन कार्ड किंवा फॉर्म 60 आणि फॉर्म 61 ची सत्यप्रत (जे लागू असेल), चेसिस आणि इंजिन पेन्सिल प्रिंट, मालकाच्या स्वाक्षरीसह ओळखीसह शपथपत्र आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्रात सांगावे लागेल की, आरसी हरवले आहे आणि ते जप्त करण्यात आलेले नाही. (Vehicle Registration Certificate)

 

1. ऑनलाइन पद्धत
ऑनलाइन डुप्लिकेट आरसी काढण्यासाठी प्रथम संबंधित विभागाच्या वेबसाइटवर जा. तिथे डुप्लीकेट आरसीसाठी फॉर्म 26 भरा. यासोबतच वर सांगितलेल्या कागदपत्रांची आवश्यकता भासते आणि काही माहिती सुद्धा द्यावी लागते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

2. ऑफलाइन पद्धती
तसेच ऑफलाइन पद्धतीने डुप्लीकेट आरसी काढण्यासाठी संबंधित विभागाच्या ऑफिसमध्ये जावे लागेल, जेथे तुम्ही वाहन रजिस्टर केले होते. तिथे सुद्धा तुम्हाला फॉर्म26 भरावा लागेल. येथे सुद्धा वर सांगितलेले कागदपत्र आवश्यक आहेत.

 

Web Title :- Vehicle Registration Certificate | how to apply for duplicate rc in rto lost vehicle registration certificate

 

हे देखील वाचा :

Sachin Tendulkar | मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं दिला विराट कोहलीला चांगलाच दणका, जाणून घ्या प्रकरण

83 First Review Out | रणवीर सिंहचा चित्रपट ’83’ पाहतात अंगावर आला काटा; लोकांनी केलं चित्रपटाचं ‘मास्टरपीस’ म्हणून कौतुक..!

Alia Bhatt and BMC | होम क्वारंटाईनचा नियम तोडून आलिय भट्ट पोहोचली ब्रम्हास्त्रच्या प्रोमोशनला, बीएमसी करणार कारवाई

 

Related Posts