IMPIMP

83 First Review Out | रणवीर सिंहचा चित्रपट ’83’ पाहतात अंगावर आला काटा; लोकांनी केलं चित्रपटाचं ‘मास्टरपीस’ म्हणून कौतुक..!

by nagesh
83 First Review Out | ranveer singh film 83 first movie review out fans calls it masterpiece

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – 83 First Review Out | बहुचर्चित 83 (Movie 83) चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह (Ranveer Singh) मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. तसेस 24 डिसेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करणार येणार आहे. (83 First Review Out)

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

हा चित्रपट 1983 मध्ये झालेल्या ऐतिहासिक विजयाच्या आठवणींवर करण्यात आला असून, या चित्रपटासाठी रसिक प्रेक्षक आतुर झाले आहेत. चित्रपट
24 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून, बॉलीवूडमधील काही लोकांनी चित्रपट बघितला आहे. त्यांनी कबीर खानच्या (Kabir Khan) चित्रपटांमधील हा
एक ‘मास्टरपीस’ म्हणून कौतुक केला आहे.

हा चित्रपट कबीर खान दिग्दर्शित (Director Kabir Khan) असून त्यांची पत्नी मिनी माथूरनं इंस्टाग्रामच्या स्टोरीवर काही लोकांचे रिव्यूज आणि
स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या रिव्यूजमध्ये अनेक लोकांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. तर इंडस्ट्रीमधील लोकांनी चित्रपट बघितल्यानंतर कौतुक करणं चालू केलं आहे. 83 (Movie 83) हा चित्रपट बघितल्यानंतर लोकांनी इतक्या चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यामुळे चाहत्यांची या चित्रपटाकडे असलेली ओढ आणखीन वाढली आहे. शेअर केलेल्या रिव्यूजमध्ये कोणी एकानं, या चित्रपटाला ‘मास्टरपीस’ असं म्हटलं आहे. एका नेटकऱ्यांनी म्हटलं की, हा चित्रपट बघून अंगावर काटा आला, सोबतच दिग्दर्शनाची देखील कौतुक केलं आहे. (83 First Review Out)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

एका युजरनं रिव्यूमध्ये लिहिलं की, “काय चित्रपट आहे. हास्य, रडणे, हूटिंग, चियर केले आहे. धन्यवाद! कबीर खान असा सुंदर चित्रपट देण्यासाठी.” तर दुसऱ्या युजरं, “आता याला कोणी थांबू शकत नाही. बॉल पार्कच्या बाहेर गेला आहे. मी चित्रपट बघितला आहे, पुन्हा एकदा बघण्यासाठी मी आता प्रतीक्षा करू शकत नाही. कबीर तू खरच कमाल केलं आहेस.” असं कमेंटमध्ये लिहिलं. एकानं ‘चित्रपट बघताक्षणी अंगावर काटा आला, तर हा चित्रपट मास्टरपीस आहे’ असं म्हणून चित्रपटाबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं.

दरम्यान, चित्रपट ‘83’ चा जोरदार प्रमोशन केलं जात आहे. 83 मध्ये रणवीर सिंहनं कपिलदेव (Kapil Dev) यांची भूमिका साकारली असून, दीपिका पादुकोणनं (Deepika Padukone) कपिल देव यांची पत्नी रोमी भाटियाचं पात्र साकारलं आहे. हा चित्रपट हिट होणार आहे, याबद्दल काही शंकाच नाही. तसेच या चित्रपटाला हिंदी सोबतच दुसऱ्या अन्य भाषांमध्ये देखील रिलीज प्रदर्शित करण्यता येणार आहे.

 

Web Title: 83 First Review Out | ranveer singh film 83 first movie review out fans calls it masterpiece

 

हे देखील वाचा :

Alia Bhatt and BMC | होम क्वारंटाईनचा नियम तोडून आलिय भट्ट पोहोचली ब्रम्हास्त्रच्या प्रोमोशनला, बीएमसी करणार कारवाई

Personal Data Protection Bill | सोशल मीडिया कंपन्यांवर लगाम लावण्याची तयारी, डेटा लीक झाला तर भरावा लागेल 15 कोटीपर्यंत दंड

Uday Samant | उदय सामंत मनसेत प्रवेश करण्याची शक्यता, खोपकर यांचे उपहासात्मक ट्विट, म्हणाले…

 

Related Posts