IMPIMP

आता जुने चॅट आणि कॉन्टॅक्ट न गमावता कसा बदलायचा WhatsApp नंबर? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

by nagesh
High Court | whatsapp group admins not liable for objectionable posts by members says kerala high court whatsapp news

नवी दिल्ली : वृत्तसंस्था WhatsApp चा वापर मेसेज पाठवण्यासाठी किंवा चॅटसाठी भारतात सर्वात जास्त केला जातो. काहीही बोलण्यासाठी ते महत्वाची माहिती शेयर करण्यासाठी या अ‍ॅपचा वापर केला जातो. अशावेळी जेव्हा कुणी यूजर आपला स्मार्टफोन (Smartphone) किंवा मोबाइल फोन नंबर बदलतो, तेव्हा नेहमी तो जुने चॅट किंवा कॉन्टॅक्ट नंबर गमावतो. हे टाळण्यासाठी काय करायचे ती प्रोसेस स्टेप बाय स्टेप जाणून घेवूयात. (WhatsApp)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

असे मिळवू शकता जुने चॅट

– सर्वप्रथम WhatsApp अ‍ॅपमध्ये ‘सेटिंग’मध्ये जा.

– यानंतर ‘अकाऊंट‘ उघडा, नंतर ‘नंबर बदला’ पर्यायाची निवड करून पुढील क्लिक करा.

– परंतु नेक्स्ट बटन दाबण्यापूर्वी जुना आणि नवीन नंबर नोंदवावा लागेल.

– आता कन्फर्मेशनसाठी स्क्रीनवर मेसेज दिसेल.

– आता सर्व संपर्क, माझ्याकडील संपर्क आणि कस्टमसारखे पर्याय निवडू शकता.

– अधिसूचनेवर क्लिक केल्यानंतर संपर्क माहिती अपडेट होईल.

– आता सबमिट बटनवर क्लिक करा.

एकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यूजर्सला अ‍ॅप पुन्हा उघडावे लागेल आणि एक ओटीपी नोंदवावा लागेल. एकदा ओटीपी नोंदवल्यानंतर, चॅट जैसे थे राहील आणि तुमचा मोबाइल फोन नंबर प्रभावी प्रकारे बदलला सुद्धा जाईल. हे फीचर तेव्हाच काम करेल जेव्हा नवीन नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.

 

Web Title :- 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 24 वर्षीय तरूणीची 4 मजली इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या, पुण्याच्या वाकड परिसरातील घटना

Ration Card Update | तुमचा सुद्धा झाला असेल विवाह तर रेशन कार्ड करा अपडेट, अन्यथा मिळणार नाहीत अनेक विशेष सुविधा; जाणून घ्या प्रक्रिया

Varsha Gaikwad | शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं विधान; म्हणाल्या – ‘…तर शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेऊ’

 

Related Posts