IMPIMP

Ration Card Update | तुमचा सुद्धा झाला असेल विवाह तर रेशन कार्ड करा अपडेट, अन्यथा मिळणार नाहीत अनेक विशेष सुविधा; जाणून घ्या प्रक्रिया

by nagesh
Ration Card | ration card follow these step by step process to add new member name in ration card

नवी दिल्ली : वृत्त संस्थारेशन कार्ड (Ration Card Update) भारतात राहणार्‍या सर्व लोकांसाठी एक आवश्यक कागदपत्र आहे, परंतु जर तुमचा विवाह झाला असेल तर तुम्ही रेशन कार्डमध्ये एक मोठे अपडेट (Ration Card Update) करून घ्या, ज्यामुळे तुम्हाला मोफत रेशनचा फायदा मिळत राहील. अन्यथा खुप नुकसान होऊ शकते.

 

 

रेशन कार्डमध्ये अशाप्रकारे नोंदवा नवी सदस्याचे नाव (Add New Member Name In Ration Card)

  • तुम्ही https://drive.google.com/file/d/1Pbl2GNYQMcNAYN4F1fQ25kTOnCgdF8cA/view या लिंकद्वारे फॉर्म डाउनलोड करा.
  • याशिवाय तुम्ही अन्न विभागात जाऊनही हा फॉर्म घ्या.
  • यानंतर, तुम्हाला कुटुंब प्रमुखाचे नाव, शिधापत्रिका क्रमांक, प्रमुखाच्या पती/वडिलांचे नाव भरा.
  • आता प्रभाग, ग्रामपंचायत, तहसील आणि जिल्ह्याचा तपशील भरा.
  • आता कुटुंब प्रमुखाचा पूर्ण पत्ता भरा.
  • याशिवाय अर्जात रेशन दुकानाचे नाव आणि ओळखपत्र नोंदवा.
  • आता ज्या सदस्याचे नाव नोंदवायचे आहे त्याचे तपशील भरा.
  • फॉर्म भरल्यानंतर सही किंवा अंगठ्याचा ठसा उमटवावा.
  • आता सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • हा फॉर्म अन्न विभागाकडे जमा करा.
  • सबमिशन केल्यानंतर, पावती घेणे आवश्यक आहे.

 

अन्न विभाग करेल चौकशी

या संपूर्ण प्रक्रियेनंतर अन्न विभाग तुमचा अर्ज तपासेल. सर्व तपशील बरोबर असल्यास नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेत नोंदवले जाईल. शिधापत्रिकेत नाव समाविष्ट होताच पुढील महिन्यापासून त्यांच्या वाट्याचे रेशन मिळण्यास सुरुवात होईल. (Ration Card Update)

 

 

या कागदपत्रांची आवश्यकता

  • अर्जदार/कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट (Passport) आकाराचा फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्रासाठी वीज बिल, पाणी बिल आणि मतदार ओळखपत्र.
  • नवविवाहित महिलेचे नाव तिच्या वडिलांच्या शिधापत्रिकेवरून वगळल्याचे प्रमाणपत्र.
  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र (marriage certificate)

 

 

Web Title :- Ration Card | ration card name update add newm member in ration card check here full process ration card madhe nav aad karnyachi prakriya marathi news

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | आजही सोन्याच्या दरात घसरण पण चांदी ‘जैसे-थै’, जाणून घ्या नवीन दर

Viral Video | परीक्षेत करत होता कॉपी, डोक्यावर होता विग; कानात लपवले होते ईयरफोन (व्हिडीओ)

Maharashtra Omicron variant | महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढण्याचा टास्क फोर्सचा अंदाज; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

 

Related Posts