IMPIMP

‘पत्नी रूग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय, तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, टिका करणं सोपं पण…’

by pranjalishirish
wife hospital son fighting covid uddhav thackeray apprecieate jitendra awhad about corona

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक वाढत असून, रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरातच कोरोनाने शिरकाव केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे हे दोघेही कोरोनाबाधित आहेत. आता त्यावरूनच राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad  यांनी भावनिक ट्विट करत लक्ष वेधले आहे.

शिवसेनेकडून भाजपला टोला, म्हणाले – ‘किमान, व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका’

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, रुग्णसंख्या रोखण्यात अपेक्षित असे यश आले नाही. त्यावरून राज्यातील वस्तूस्थिती मांडण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी काल (शुक्रवार) जनतेशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी सरकारकडून काय पावले उचलली जात आहेत आणि जाणार आहेत याची थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्याला सलाम केला.

जितेंद्र आव्हाड  Jitendra Awhad यांनी ट्विट करत म्हटले, की ‘पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळत आहेत…त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!’

अनेक ख्यातनाम विचारवंताचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठबळ, म्हणाले…

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम सोहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीवरून भाजपकडून टीका करण्यात आली होती. ‘घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, तरीही मुख्यमंत्री जाहीर कार्यक्रमात का? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

Also Read : 

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’

दुर्दैवी ! ‘कोरोना’मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नुकतेच सन्मानित झालेले जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कठोर निर्बंध लावणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

Related Posts