IMPIMP

घरात दोन कोरोनाबाधित असतानाही मुख्यमंत्री जाहीर कार्यक्रमात का?; भाजपचा सवाल

by bali123
bjp leader atul bhatkhalkar slams uddhav thackeray over corona virus and balasaheb thackerays

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरुच आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. पण ते स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमात जाहीररित्या दिसले. त्यावरून आता भाजप आमदाराने त्यांच्यावर निशाणा साधला. ‘घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असले तरीही मुख्यमंत्री जाहीर कार्यक्रमात का?, असा सवाल उपस्थित केला.

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम सोहळा नुकताच पार पडला. त्यामध्ये मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती. उद्धव ठाकरे uddhav thackeray यांच्या उपस्थितीवरून टीका केली जात आहे. कारण मुख्यमंत्र्यांच्या घरी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामध्ये त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे हे आहेत. हे मुख्यमंत्र्यांच्या घरातील सदस्य कोरोनाबाधित आढळल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत निशाणा साधला.

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

त्यामध्ये भातखळकर म्हणाले, ‘मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या uddhav thackeray उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा…’

Also Read:

मनसेची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शून्य असल्यानं राज्यात कोरोना वाढतोय, हे सरकारचं अपयश’


‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान

 

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

 

‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’


Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

 

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

 

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

Related Posts