IMPIMP

World Boxing Championship | भारताला मोठा धक्का! मेरी कोमची वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधून माघार

by nagesh
World Boxing Championship | world boxing championship big shock to india six time champion mary kom withdraws from world boxing championships

सरकारसत्ता ऑनलाईन  टीम – World Boxing Championship | 6 वेळा विश्वविजेती महिला बॉक्सर मेरी कोमने (Mary Kom) यंदाच्या बॉक्सिंग महिला विश्व चॅम्पियनशिपमधून माघार घेतली आहे. यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे मेरी कोमने माघार घेतली आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये एकूण आठ पदके जिंकणाऱ्या 40 वर्षीय मेरीने दुखापतीबाबत अजून कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा यावर्षी 1 ते 15 मे दरम्यान ताश्कंद, उझबेकिस्तान या ठिकाणी पार पडणार आहे. (World Boxing Championship)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मेरी कोमची प्रतिक्रिया
मेरी कोमने वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधून माघार घेतल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “दुखापतीमुळे मी आईबीए महिला वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 मध्ये सहभागी होऊ शकणार नाही. मी लवकर बरा होण्याचा प्रयत्न करत आहे. मला आशा आहे की या चॅम्पियनशिपमधून आम्हाला आणखी चॅम्पियन्स मिळतील. मी सर्व सहभागींना शुभेच्छा देते.” असे मेरी कोम म्हणाली आहे. (World Boxing Championship)

 

मेरी कोमची कामगिरी
सर्व काळातील महान भारतीय खेळाडूंपैकी एक, मेरी कोम ही जागतिक चॅम्पियनशिपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी बॉक्सर आहे.
पहिल्या सात जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ती एकमेव महिला बॉक्सर आहे.
आठ जागतिक चॅम्पियनशिप पदके जिंकणारी एकमेव बॉक्सर (पुरुष किंवा महिला) आहे.
दक्षिण कोरियाच्या इंचॉन येथे 2014 च्या आशियाई खेळांमध्ये सुवर्ण जिंकणारी मेरी पहिली भारतीय महिला बॉक्सर आणि
2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरली. 2021 च्या लंडन ऑलिम्पिकमध्येही तिने कांस्यपदकावर आपले नाव कोरले होते.

 

Web Title :- World Boxing Championship | world boxing championship big shock to india six time champion mary kom withdraws from world boxing championships

 

हे देखील वाचा :

BJP MLA Ashish Shelar | ‘नवाब मलिक, दाऊदच्या व्यवहारांना संरक्षण, याकूबची कबर सजवली आता…’ आशिष शेलारांचे मविआवर टीकास्त्र

Farhan Akhtar – Shraddha Kapoor | घटस्फोटानंतर अभिनेता फरहान अख्तर होता ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात; ‘हे’ ठरलं ब्रेकअपच कारण

Bigg Boss Marathi 4 | ‘बिग बॉस’ फेम आरोह वेलणकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

 

Related Posts