IMPIMP

Yavatmal Crime News | नुकतीच बदली होऊन आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ

by nagesh
Yavatmal Crime News | police contable mangilal chavhan ends life

यवतमाळ :  सरकारसत्ता ऑनलाईन – Yavatmal Crime News | काही दिवसांपूर्वीच बदली (Police Transfer) झाल्याने आणि गावाकडून
येणंजाणं अवघड होत असल्याने पोलीस कर्मचाऱ्याने शहरात रूम घेतली. काही दिवस सर्वकाही सुरळीत सुरु असताना सोमवारी या पोलीस
कर्मचाऱ्याचा (Police Constable) हॉटेलमध्ये मृतदेह आढळून (Yavatmal Crime News) आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मांगीलाल नामदेव चव्हाण Mangilal Namdev Chavan (वय-34 रा. शेलू बु, ता. पुसद) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. चव्हाण यांचा मृतदेह
(Dead Body) यवतमाळ शहरातील मकरंद हॉटेलमध्ये आढळून आला. ते यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात (Yavatmal City Police Station)
कार्यरत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मांगीलाल चव्हाण हे वडगाव जंगल पोलीस ठाण्यात (Vadgaon Jungle Police Station) कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली यवतमाळ शहरात झाली होती. गावाला दररोज जाणे शक्य नसल्याने ते शहरातील दत्त चौक परिसरात असलेल्या मकरंद हॉटेलमध्ये रुम घेऊन राहत होते. सोमवारी सकाळी मंगिलाल हे हॉटेलमधील रुममध्ये मृतावस्थेत आढळून आले. (Yavatmal Crime News)

 

घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडी पोलीस ठाण्यातील (Avdhut Wadi Police Station) पोलीस अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यान, या अवधुतवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Yavatmal Crime News | police contable mangilal chavhan ends life

 

हे देखील वाचा :

Jalgaon Crime News | जळगावमध्ये तापी नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Lions Veterans Cup T-20 Cricket | लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२३ स्पर्धा; लवास रॉयल्स्, रॉयल्स् पासलकर, गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजी, बाश्री ब्लास्टर्स संघ उपांत्य फेरीत

 

Related Posts