IMPIMP

Ajit Pawar On Code Of Conduct | आचारसंहितेबाबत अजित पवारांचे महत्वाचे संकेत, उद्यापासून…

by sachinsitapure

बारामती : Ajit Pawar On Code Of Conduct | लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू होत असून सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करू लागले आहेत. राजकीय घडामोडींना देखील सर्वत्र वेग आला आहे. त्यातच आचारसंहिता कधी लागू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. ते बारामतीमध्ये (Baramati) कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी बोलत होते.

अजित पवार आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी येथील बैठकीत उपस्थितांशी बोलताना राज्यात उद्यापासून आचारसंहिता सुरू होणार आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार असल्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत. अजित पवार यांनी आज सकाळपासूनच बारामतीत गाठीभेटी आणि सभांना सुरुवात केली.

बारामतीमधील या बैठकीत भावनिक आवाहन करताना अजित पवार म्हणाले, तुम्ही मला आजपर्यंत साथ दिली आहे, तशाच प्रकारची साथ लोकसभेच्या निवडणुकीतही द्या. उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकांच्या निमित्तानेही मी घड्याळाच्या चिन्हावर तुम्हाला उमेदवार देणार आहे. त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा.

अजित पवार पुढे म्हणाले, केंद्राच्या योजना आपल्याला मोठ्या प्रमाणावर आणायच्या आहेत. त्यासाठी, तुमचीही साथ हवी आहे. कुठेही भावनिक होऊ नका, मी तुमचे नेहमी एकत आलो आहे, आता माझेही तुम्हाला ऐकावे लागेल. माझा शब्द तुम्ही मोडू नये, असे मला वाटते, तो तुमचा अधिकार आहे.

Pune Crime Branch | मोक्का गुन्ह्यात दोन वर्ष फरार असलेल्या आरोपीला पुणे गुन्हे शाखेकडून अटक

Related Posts