IMPIMP

Ajit Pawar NCP | अजित पवार गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस; पक्षनेतृत्वाशी मान्यता घेऊन बोलण्याची ताकीद

by sachinsitapure

मुंबई : Ajit Pawar NCP | लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फक्त एक जागा मिळाली. यामध्ये बारामतीची जागाही अजित पवारांना निवडून आणता आली नाही. सुनेत्रा पवार यांचा या मतदारसंघात पराभव झाला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न असणार आहे. त्यातच आता जागावाटपाच्या आकड्यावरुन वाद झाल्यानं पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस दिली असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याकडून ही नोटीस देण्यात आली आहे. महायुतीबाबत राजकीय भाष्य करताना पक्षनेतृत्वाशी मान्यता घेऊन बोलण्याची ताकीद देण्यात आली आहे. जागावाटपाच्या आकड्यावरुन वाद झाल्यानं प्रवक्त्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.

अशी वक्तव्ये आल्याने महायुतीत समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले होते. यंदा लोकसभा निवडणुकीत भाजपलाही आपला करिष्मा दाखवता आला नाही. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील मित्र पक्ष एकमेकांवर टिप्पणी करताना दिसत आहेत. त्यामुळेच आता प्रवक्त्यांना नोटीस दिली असल्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींच्या वक्तव्यांमुळे भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. अमोल मिटकरींनी महायुतीतील घटक पक्षांवर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. अमोल मिटकरींचे तोंड आवरा असं भाजपचे प्रवक्ते प्रवीण दरेकरांनीही म्हंटले होते.

Related Posts