IMPIMP

Alia Bhatt Mom Soni Razdan | अभिनेत्री आलिया भट्टच्या आईला बोगस ड्रग्ज केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न, अभिनेत्रीने दिली स्कॅमची माहिती

by sachinsitapure

मुंबई : Alia Bhatt Mom Soni Razdan | बॉलीवुड अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राजदान यांच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. ही माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. सोनी राजदान यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटले आहे की, त्यांना एका ड्रग्ज प्रकरणात फसवण्याचा कट रचण्यात आला होता. त्यांना एक फोन आला आणि त्यांच्याकडे आधार नंबर मागितला जात होता.

सोनी राजदान यांनी ही पोस्ट मुंबई पोलिसांना सुद्धा टॅग केली आहे. तसेच लोकांनाही सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

सोनी राजदान यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काय लिहिले आहे…

सोनी राजदान यांनी याबाबत इन्स्टाग्रामवर तीन पोस्ट केल्या आहेत. यापैकी पहिल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा मोठा स्कॅम आहे जो प्रत्येकाच्या आजुबाजूला होत आहे. एक कॉल आला, आणि म्हणाला तो दिल्ली कस्टममधून बोलत आहे. तुम्ही काही बेकायदेशीर ड्रग्ज ऑर्डर केले आहे. तो स्वत: पोलिस असल्याचे सांगत होता.

तर दुसऱ्या पोस्टमध्ये राजदान यांनी लिहिले आहे की, नंतर ते तुमच्याकडे तुमचा आधार क्रमांक मागातात, मलाही असाच कॉल आला. त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी केली. बॉटम लाईन ही आहे की तुम्ही अशा कॉलला फसू नका आणि त्यांचे ऐकू नका. माझ्या माहितीमधील कोणीतरी त्यांच्या बोलण्याला फसले आणि त्यांना मोठी रक्कम द्यावी लागली होती. आता ते अस्वस्थ आहेत. कोणा सोबतही असे होऊ नये, यासाठी मी या पोस्ट करत आहे.

तिसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, नशिबाने मी त्या लोकांच्या बोलण्याला फसले नाही. ते लोक माझे आधारकार्ड मागत होते. आशा आहे की आता त्यांचा कॉल येणार नाही. परंतु, या प्रसंगाने मला घाबरवले. अशाप्रकारचे कोणत्याही नंबरवरून कॉल आल्यास ताबडतोब तो सेव्ह करा आणि पोलिसांकडे जा.

PM Narendra Modi Sabha In Mumbai | नैराश्याने ग्रासलेल्या काँग्रेसने देशाला पाच दशके मागे ढकलले; शिवाजी पार्कच्या विराट सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात

Related Posts