IMPIMP

आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका, म्हणाले- ‘मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे काय ?’

by sikandershaikh
ashish-shelar-uddhav-thackeray

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे काय, हा दुजाभाव मुंबईकरांसोबत करताय लक्षात असू द्या असं म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेने (Shiv Sena) वर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. विकासनिधी वाटपावरून शेलारांनी ही टीका केली आहे. कमी विकास निधी देण्यात आल्यानं भाजपच्या नेत्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आशिष शेलार यांनी ट्विटरवरून पोस्ट शेअर करत याबाबत भाष्य केलं आहे.

आशिष शेलार (ashish shelar) आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 650 कोटी विकास निधी पैकी शिवसेनेच्या 97 नगरसेवकांना 230 कोटी, भाजपच्या 83 नगरसेवकांना 60 कोटी आणि काँग्रेस 29 नगरसेवकांना 81 कोटी आणि हो स्थायी समिती अध्यक्षांना एकट्याला 30 कोटी…. मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधाव प्रा. लि. कंपनी आहे काय ? हा दुजाभाव मुंबईकरांसोबत करताय हे लक्षात असू द्या. असं म्हणत शेलारांनी टीका केली आहे.

महापालिकेचा 2020-21 चा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजुर करताना 700 कोटींचा निधी नगरसेवकांच्या विकासकामांसाठी देण्यात आला.
तर 2021-22 मध्ये 650 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

उत्पन्नात मोठी घट असताना कोरोना काळात 1600 कोटी रुपये खर्च झाल्यानं महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे.
परंतु यावेळी अंतर्गत निधीतून कर्ज उचलणंही शक्य नसल्यानं आता शेअर बाजारातून कर्जरोख्यातून पैसे उभे करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार सुरू आहे.
मोठ्या प्रकल्पांसाठी 3 ते 4 हजार कोटी निधीची गरज भागवण्यासाठी हे पाऊल उचललं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान यावरून आशिष शेलार यांनी सत्ताधाऱ्यांवर याआधीही टीका केली होती.

 

Related Posts