IMPIMP

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | फडणवीसांची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले – ‘फोटोग्राफीची आवड असलेला मुख्यमंत्री बनला तर …’

by sachinsitapure

मुंबई : Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | आमदार अमित साटम (MLA Ameet Satam) यांच्या ‘उडान’ या पुस्तकाचे काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘एखाद्याला एखाद्या गोष्टीत आवड आहे, त्याच गोष्टी त्यांनी कराव्यात. एखाद्याची आवड फोटोग्राफी असेल पण तो मुख्यमंत्री झाला तर काय होते?’ असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. भाजप आमदार अमित साटम यांच्या ‘उडान’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी राजकारणावरही भाष्य केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की व्यस्त राजकारणातून अमित साटम यांनी वेळ काढून पुस्तक लिहिले. मी थोडे वाचले आहे. नव्या पिढीला दिशा देण्याचे काम पुस्तकातून केले आहे. आमदार अमित साटम हे आक्रमक राजकारणी आहेत. राजकारण सोडून शांत आणि संयमी व्यक्ती म्हणून अमित साटम प्रसिद्ध आहेत.

ज्या विषयाची पूर्ण माहिती असते, त्या आमदारांमध्ये अमित साटम यांचे नाव येते. अनेक आमदार फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी बोलतात. फक्त तीन ते चार आमदार असे आहेत ज्यांना विषयाची पूर्ण माहिती असते, त्यातले अमित साटम आहे, अशी स्तुतीस्तुमणे फडणवीस यांनी यावेळी उधळली.

Related Posts