IMPIMP

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘लिफ्ट मागितली तरी ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचणार नाहीत’; फडणवीस-ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेंची खोचक टीका

by sachinsitapure

मुंबई: Eknath Shinde On Uddhav Thackeray | आजपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरु झाले आहे (Maharashtra Monsoon Session). दरम्यान पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याबाबत अनेक नेत्यांनी भाष्य केले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही यावर वक्तव्य केले आहे.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लिफ्टमधील प्रवासाबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, कुणी लिफ्ट मागितली तरी ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. तसेच दोन वर्षांपूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे, ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो. तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केले. त्यामुळे काही लोकं बोलत आहेत, काही लोकं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणून तिसऱ्यांदा पेढे वाटत आहेत, आनंद आहे, चांगलं आहे, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केले.

भाजपाच्या २४० जागा आल्या. तर इंडिया आघाडीच्या सगळ्यांच्या मिळून तेवढ्या जागा आल्या नाहीत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तर जनतेने तुम्हाला पराभूत केले. एवढं खोटं नॅरेटिव्ह पसरवून, संविधान बदलणार, आरक्षण जाणार असं खोटं वातावरण निर्माण करून सुद्धा या देशातील जनतेने नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवले, याचा आनंद विरोधक साजरा करत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला.

Related Posts