IMPIMP

Eknath Shinde – Pune Porsche Car Accident | पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या जामिनाविरोधात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

by sachinsitapure

मुंबई : Eknath Shinde – Pune Porsche Car Accident | कल्याणीनगर पोर्शे कार अपघाताबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे (Kalyani Nagar Car Accident). या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मागील आठवड्यात जामीन दिला होता. या जामिनाला विरोध करण्यासाठी पुणे पोलिसांना (Pune Police) मुख्यमंत्र्यानी हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाण्यासाठी पुणे पोलिसांकडून राज्य सरकारकडे परवानगी मागण्यात आली होती.

उच्च न्यायालयाने २५ जूनला आरोपीला जामीन दिला होता. १९ मे रोजी अपघातानंतर पोलिसांनी आरोपीला बालसुधारगृहात पाठवले होते. मात्र काही तासातच त्याला जामीन दिला होता. १९ मे रोजी अपघातानंतर पोलिसांनी आरोपीला बालसुधारगृहात पाठवले होते. मात्र काही तासातच त्याला जामीन दिला होता. मात्र यानंतर रोष उफाळून आल्यांनतर पुन्हा एकदा अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली.

२५ जून रोजी अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहातून मुक्त केल्यानंतर त्याचा ताबा त्याच्या आत्याकडे देण्यात आला होता. आरोपीच्या आत्याने मुलाची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने ही मुक्तता केली.

कल्याणी नगर भागात मद्यधुंद अवस्थेत पोर्शे ही आलिशान कार चालवून अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना एका अल्पवयीन आरोपीने चिरडले होते. त्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलास न्यायालयात हजर केल्यावर, अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून जामीन देण्यात आला होता. त्या निर्णयांची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा याचिका दाखल केल्यावर, अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली होती.

Related Posts