IMPIMP

Gold Silver Price Today | सोनं 210 रुपये तर चांदीच्या किंमतीत 400 रुपयांची घसरण; जाणून घ्या आजचे नवे दर

by nagesh
Gold Price Today | gold and silver rate today on 19th august 2021 on multi commodity exchange check latest rates here

मुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Gold Silver Price Today | मागील काही आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. मात्र मागील तीन दिवस सोन्याचा भाव जैसे थे दिसत आहे. मात्र, त्यामध्ये आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याच्या किंमतीत 210 रुपयांची घट झाली आहे. याचबरोबर चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. आज चांदीच्या दरात 400 रुपयांची घसरण झाली आहे. तर सोन्याचा दर सध्या 47,660 रुपये तर, चांदीची किंमत 67,100 रुपये पर्यंत पोहचली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मागच्या आठवड्याचा विचार करता सोन्याच्या भावात (Gold Price) घसरण आणि स्थिरता दिसून येते. 21 जुलैला 180, 22 जुलै 220, आणि 23 जुलैला 30 रुपयांची घट झाल्यानंतर पुढचे 3 दिवस सोन्याचा भाव स्थिर पाहायला मिळाला. नंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. दरम्यान, गतवर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दराने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यात आता जवळजवळ 8 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तसेच, मागील महिन्यात, 1 जून रोजी चांदीचा भाव (Silver Price) हा 72,600 रुपये इतका होता. त्यानंतर किंमतीत घट होऊन ती 70 हजारांच्या आत आलीय.

 

 

या दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झालीय. आणि डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला आहे. म्हणून सोन्याच्या दरात वारंवार घट होत आहे. मागील 2 महिन्यात सोन्याच्या किमतीत (Gold Price) घसरण झाली आहे. मात्र, आगामी काळात भाव वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

 

 

मुंबई आणि पुण्यातील सोन्याचा भाव – (Gold Price)

24 कॅरेट सोन्याचा दर : 47,660 रुपये

22 कॅरेट सोन्याचा दर : 46,660 रुपये

चांदीची किंमत – (Silver Price)

एक किलो प्रमाणे : 67,100 रुपये

 

 

Web Title :- gold silver price today gold rate fall by rs 210 and silver rate fall by rs 400

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील निलंबीत पोलिसावर खुनी हल्ला, दोघे ताब्यात तर 9 जणांविरूध्द FIR

Viral Video | रस्ता ओलांडताना करू लागले छेडछाड, हत्तीने तरूणांला चिरडून मारून टाकले (व्हिडीओ)

Coronavirus in India | देशात गेल्या 24 तासात 43 हजारपेक्षा जास्त नवीन कोरोना रूग्ण, 3 आठवड्यातील सर्वाधिक प्रकरणं

 

Related Posts