IMPIMP

Maharashtra Budget 2024 | ‘अडीच वर्ष त्यांनी लाडका बेटा योजना राबवली, आम्ही बहिणींसह भावांनाही न्याय दिला’; एकनाथ शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर

by sachinsitapure

मुंबई: Maharashtra Budget 2024 | अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (CM Majhi Ladki Baheen Scheme) या योजनेची घोषणा केली आहे.राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे.

दरम्यान या योजनेच्या घोषणेवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला होता. ‘लाडका भाऊ योजना का राबवत नाही’ असे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) म्हंटले होते. त्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “आम्ही लाडका भाऊ योजना केली आहे. १० हजार रुपये देत आहोत. पण त्यांनी अडीच वर्षे लाडका बेटा योजना राबवली, त्याचे काय, असा खोचक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या. राज्यातील सर्व मुलींचे शिक्षण मोफत करण्यात येत आहे. अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे. अजितदादा वाद्याला पक्के आहेत. त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणारे आहेत. आतापर्यंत जे जे बोललो, ते ते पूर्ण करून दाखवले आहे “, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, अर्थसंकल्पात सर्व पैशांची तरतूद करून या सर्व योजना केलेल्या आहेत. या योजना पूर्णपणे राबवल्या जातील. दुधाला ५ रुपये वाढ केली आहे. सोयाबीन आणि कापसाला साडेचार हजार कोटींची तरतूद केलेली आहे. शेतकऱ्यांना काय दिले, हे विचारणाऱ्यांना सांगू इच्छितो की, गेल्या दोन वर्षांत सगळे निकष बदलून, विविध योजनांच्या माध्यमातून ४५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. खोटे बोला पण रेटून बोला, हेच विरोधकांचे धोरण राहिले आहे असे शिंदे यांनी सांगितले.

Related Posts