IMPIMP

Maharashtra Budget 2024 | राज्यातील महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा; दरमहा मिळणार ‘इतकी’ रक्कम, जाणून घ्या

by sachinsitapure

मुंबई: Maharashtra Budget 2024 | आगामी विधानसभा (Maharashtra Assembly Election) डोळ्यासमोर ठेऊन आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तुकाराम महाराजांच्या अंभगाने अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. दिंड्या आणि वारकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या. याशिवाय अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची घोषणा केली आहे. (CM Majhi Ladki Baheen Scheme)

राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होणार आहेत. २१ ते ६० वयोगटातील विवाहित , विधवा, घटस्फोटित, निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. येत्या जुलै महिन्यापासून या योजनेला सुरुवात होणार आहे. या योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लाडली बहना योजना लागू केली होती. या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते. या योजनेला मध्य प्रदेशमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली. याच योजनेच्या जोरावर शिवराजसिंह यांनी मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकली. महिला मतदारांनी त्यांना भरभरून मतं दिली होती.

Related Posts