IMPIMP

Maharashtra Weather Update | मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, रायगड-रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट, पुढील 4 दिवस पावसाचे

by sachinsitapure

मुंबई : Maharashtra Weather Update | अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने पुन्हा नव्या दमाने बरसण्यास सुरूवात केली आहे. कालपासून मुंबई, कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी सतत पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान खात्याने याबाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात बुधवारपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. (Maharashtra Rains)

तसेच हवामान विभागाने म्हटले आहे की, विदर्भात तुरकळ तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मुंबईसह अनेक भागात ढगाळ वातावरण राहिल. मुंबईत देखील जोरदार पाऊस बरसणार आहे. (Maharashtra Monsoon)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ३० जून ते ३ जुलै या ४ दिवसात पावसाचा जोर जास्त असेल. तसेच विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

कमी दाबाचे क्षेत्र हे वायव्य बंगालचा उपसागर आणि उत्तर ओडिसाच्या गंगेटी समुद्र किनारपट्टीलगतही तयार होत आहे. समुद्र सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात आज ते १ जुलैपर्यंत जोरदार पाऊस बरसणार आहे. मराठवाड्यात जोरदार पाऊस पडणार आहे.

हवामान विभागाने म्हटले आहे की, पुणे शहरात आज आणि उद्या ढगाळ वातावरण असेल. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. १ जूलैनंतर आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मुसळधार पाऊस पडू शकतो. घाटातील भागात यलो अलर्ट तर पुढील काही दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे.

तसेच सातारा, कोल्हापूर घाट भागात तुरळक तसेच मुसळधार पाऊस पडेल. पुढील ४ दिवस ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा तसेच नाशिक परिसरात मुसळधार पाऊस पडणार असून येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येथे ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील चार दिवसात बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडणार आहे. ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील.

Related Posts