IMPIMP

MBBS Students News | MBBS च्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

by nagesh
MBBS Students News | mbbs students will no longer be able to change colleges during the internship period

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MBBS Students News | एमबीबीएस (MBBS) करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठानं मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने (Maharashtra Health University) हा निर्णय घेतला असून आता वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमात इंटर्नशिप कालावधीसाठी (Internship Period) महाविद्यालय बदलता येणार नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एमबीबीएस (MBBS) झाल्यावर विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयामध्ये इंटर्नशिप करावी लागणार आहे. याआधी एमबीबीएस (MBBS) झाल्यावर इंटर्नशिप करण्यासाठी महाविद्यालय बदलता येत होतं. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांनी 28 नोव्हेंबरला देशातील (Compulsory Rotating Medical Regulations 2021) यात काही अधिसूचना जाहीर केल्या होत्या. त्यानुसार आता एक परिपत्रक जाहीर केलं आहे.

 

राज्यात एमबीबीएस कोर्स पूर्ण केला की त्याच महाविद्यालयाच्या संलग्नित असलेल्या रूग्णालयांमध्ये (Hospital) इंटर्नशिप करावी लागणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना महाविद्यालय, जिल्हा सोडून इतर राज्यात इंटर्नशिप करण्याची सुट नसणार आहे.

 

दरम्यान, याआधी विद्यार्थ्यांना साडे चार वर्षे एमबीबीएसचं शिक्षण घेतल्यावर त्यांना इंटर्नशिप
ही दुसऱ्या कोणत्याही रूग्णालयात किंवा बदली मिळत असे.
काहींना आंतरजिल्हा (Interdistrict) किंवा आंतरराज्य (Interstate) रूग्णालयात मुभा मिळत होती.
नवीन नियमांमुळे प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयात रुग्णांना चांगली सेवा मिळणार असल्याचं दिसत आहे.

 

Web Title :- MBBS Students News | mbbs students will no longer be able to change colleges during the internship period

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | “महाविकास आघाडी सरकारचा बुरखा टराटरा फाडा”; चंद्रकांत पाटलांचं ओबीसींना आवाहन!

Sanjay Nirupam on Raj Thackeray | “सरकारला राज ठाकरेंची भीती वाटते”; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा घरचा आहेर !

WhatsApp च्या नवीन अपडेटमध्ये Admin ला मिळेल जबरदस्त Power, कुणाचाही मेसेज करू शकणार डिलीट

 

Related Posts