IMPIMP

Mumbai Building Collapse | मुंबईत मालाडच्या मालवणी येथील 4 मजली रहिवासी इमारत कोसळली; 11 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी

by omkar
Building Collapes

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  मुंबईत बुधवारी दिवसभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मालाडच्या मालवणी येथील एक चार मजली इमारतीचा (Malad Building collapse) काही भाग कोसळला. त्यात 11 जणांचा मृत्यु झाला असून 7 जण जखमी आहे. ही घटना बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये ६ लहान मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य अजूनही सुरु आहे. ढिगार्‍याखाली आणखी काही लोक असण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Pune Crime News | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा सराफ व्यावसायिकास ‘दणका’, केली मोक्का अंतर्गत कारवाई, जाणून घ्या प्रकरण

मालाडमधील मालवणी गेट क्रमांक 8 येथील अब्दुल हमीद रस्त्यावरील ही इमारतीचा काही भाग कमकुवत असल्याचे लक्षात आल्यावर तेथील नागरिकांचे स्थलांतर सुरु करण्यात आले. त्याचवेळी रात्री अकरा वाजता ही दुर्घटना झाली.
साहिल सर्फराज सय्यद (वय 8),
अरीफा शेख (वय 8),
जॉन इर्रना (वय 13 ) अशी मृतांमधील ओळख पटलेल्या लोकांची नावे आहेत.

 File photo

Rakhi Sawant on Baba Ramdev | कोरोना अन् रामदेव बाबा सारखेच (व्हिडीओ)

मारीकुमार हिरंगना (वय 30),
धनलक्ष्मी बेबी, सलीम शेख (वय 49),
रिजवाना सय्यद (वय 33),
सूर्यामणी यादव (वय 39),
करीम खान (वय 30),
गुलजार अहमद अन्सारी (वय 26) अशी जखमींची नावे आहेत.
या इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 17 जणांना वाचविण्यात आले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असून त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो.

संजय राउतांचा भाजपवर पलटवार, म्हणाले – ‘विरोधी पक्षसोबत…’

इमारतीच्या ढिगार्‍यापर्यंत जाण्यास जागा चिंचोळी असल्याने जेसीबी, अ‍ॅम्बुलन्स, अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचण्यात अडचणी आल्या.
शेजारच्या इमारतीवर कोसळलेल्या ढिगार्‍याखाली काही कोणी आहेत का याचा सध्या शोध घेतला जात आहे.

Nilesh Rane | संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का ?

Related Posts