IMPIMP

Shivsena UBT Vs Eknath Shinde | ठाकरेंच्या नेत्याने शिंदे गटाच्या जखमेवर चोळले मीठ, १३ पैकी ७ खासदारांची तिकीटे कापली, आता मातोश्रीची आठवण…

April 5, 2024

मुंबई : Shivsena UBT Vs Eknath Shinde | एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या १३ पैकी ७ खासदारांची तिकीटे कापली गेली. हा नियतीचा खेळ आहे. त्यांना पश्चाताप होत असेल. आता त्यांना उद्धव ठाकरे, मातोश्रीची आठवण येत असेल, असे म्हणत उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) शिवसेनेचे युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी शिंदे गटाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

वरुण सरदेसाई म्हणाले, २०१४, २०१९ साली या सगळ्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलावले गेले होते. स्वतः ठाकरे कुटुंब उपस्थित असायचे. रश्मी ठाकरे औक्षण करून यांना एबी फॉर्म द्यायच्या. आता दहा-दहा तास वेटिंग करावे लागते. तरी देखील तिकीट मिळत नाही.

शिंदे गटावर टीका करताना वरुण सरदेसाई पुढे म्हणाले, मातोश्रीवर मिळणारा मान आणि आत्ताचे त्यांचे स्थान हे चित्र डोळ्यांसमोर येऊन सगळ्यांना जाणीव झाली असेल. शिवसेना आम्ही पुढे घेऊन जाणार, असे म्हणणाऱ्यांना डबल देखील जागा मिळवता येत नाहीत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी २१ उमेदवारांची घोषणा केली आहे.

वरुण सरदेसाई पुढे म्हणाले, सध्याचा ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतर देखील तिकीट कापले जात आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदारांना देखील शंका असेल की माझ्या सोबत असे होईल. यामुळेच कदाचित त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जात नाही. कल्याण लोकसभेत भाजप आणि शिवसेनेने सर्व्हे केला. हा केलेला सर्व्हे निगेटिव्ह असल्याने श्रीकांत शिंदे यांच्या नावाची शिवसेनेकडून अधिकृत घोषणा होत नाही.

Navneet Rana | नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध