IMPIMP

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

by pranjalishirish
adv-umesh-chandra-yadav-appointment-special-public-prosecutor-rekha-jare-murder

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा हादरवून सोडवणा-या यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे Rekha jare यांच्या खून खटल्यात प्रसिध्द वकील ॲड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबतचा आदेश नुकताच राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने जारी केला आहे. या खटल्यात फिर्यादीच्यावतीने बाजू मांडण्यासाठी ॲड. यादव यांची नियुक्ती करावी, अशी मागणी मयत झरे यांच्या कुटुंबीयांनी शासनाकडे केली होती. मयत जरे कुटुंबीयांनी यादव यांच्या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

रेखा जरे Rekha jare यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात हत्या झाली होती. या प्रकरणात तपासात सकाळ या वृत्तपत्राचा तत्कालीन कार्यकारी संपादक बाळ बोठे याचे नाव पुढे आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक अजित पाटील यांनी तपास करून आतापर्यंत 5 आरोपीना अटक करून आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र अद्यापही या प्रकरणातील सूत्रधार बाळ बोठे पोलिसांच्या हाती लागला नाही.

Also Read :

‘मुंबई पोलिसांचे, थोबाड काळे झाले’, पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात ?

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

मनसुख हिरेन प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘त्या’ स्कॉपियोचा मालक दुसराच !

Mumbai Lockdown : मुंबईतील ‘नाइट क्लब’ सर्वांत आधी बंद करू; पालकमंत्री अस्लम शेख यांचे स्पष्ट संकेत

वृद्ध सफाई कामगाराचा गळा कापून हत्या

 

Related Posts