IMPIMP

Pune Crime | भाडेकरु तरुणाने केला घर मालकिणीवर बलात्कार, आरोपी तरुणावर FIR

by nagesh
Pune Crime | 16 year old girl threatened and repeatedly raped by step father in wadgaon sheri wagholi area of pune

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | मानलेल्या भावाला (Supposed Brother) घराच्या टेरेसवरील खोलीत भाड्याने राहू दिले. त्यानंतर मानलेल्या भावाने महिलेसोबत काढलेले फोटो पतीला दाखवण्याची धमकी (Threat) देऊन बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) घडली आहे. ही घटना चिखली पोलीस ठाण्याच्या (Chikhali Police Station) हद्दीत 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास (Pune Crime) घडली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत रामहरी वगरे (वय-31 रा. असंगी, ता. जत, जि. सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 31 वर्षीय पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी महिलेच्या माहेरचा असल्याने त्यांची एकमेकांशी ओळख आहे. फिर्यादी या आरोपीला भाऊ मानत असल्याने त्यांनी घराच्या टेरेसवर (Terrace) असलेली खोली आरोपीला भाड्याने राहण्यास दिली. (Pune Crime)

 

फिर्यादी कामानिमित्त टेरेसवर गेल्या असता आरोपीने त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्यासोबत मोबाईलमध्ये फोटो (Photo) काढले. घटनेच्या दिवशी फिर्यादी टेरेसवरील पाण्याच्या टाकीचा कॉक सुरु करण्यासाठी गेल्या असता त्या एकट्या असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने त्यांना खोलीत ओढत नेले. खोलीचा दरवाजा बंद करुन फिर्यादी यांना ‘तुझे व माझे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेल आणि तुझा नवरा काही बोललाच तर त्याला इथेच मारून टाकीन. मी सांगेन तसं कर’ असे म्हणून धमकवून फिर्यादी यांच्यावर अत्याचार केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद (API Tawfiq Sayyed) करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime | Tenant youth rapes house owner woman accused youth gets FIR

 

हे देखील वाचा :

Employment News | संपूर्ण देशासाठी आनंदाची बातमी ! 9 क्षेत्रात रोजगार वाढला, ‘ही’ आहे सरकारी आकडेवारी

Supreme Court Lawyers | दहशतवादी संघटना SFJ ची SC च्या 35 वकीलांना धमकी, म्हटले – ‘PM मोदींना मदत करू नका’

PM Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2022 : ऑनलाइन अर्ज कसा करावा जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts