IMPIMP

Pravin Darekar : ‘… तर सरकार कधी कोसळेल हे देखील त्यांना कळणार नाही’

by omkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे सह्याद्री अतिगृहात (Sahyadri Guest House) प्रशासकीय अधिकाऱ्यांची (Administrative Officers) बैठक घेत होते. त्यावेळी बैठकीच्या बाहेर शोभेचं मोठं झुंबर (Slab with POP design) त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळलं. या घटनेवरुन भाजपचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. गेस्ट हाऊसचा (Guest House) स्लॅब कोसळताना जर सरकारला कळत नसेल, तर ‘आमचं सरकार पडणार नाही’ म्हणणाऱ्यांना हा एक संकेत आहे की काय असं मला वाटतं, असं दरेकर म्हणाले.

‘राज-उद्धव’ एकत्र येणार ?, खा. संजय राऊत म्हणाले…

सरकार कधी कोसळेल कळणार नाही

सह्याद्री अतिगृहात हे सरकारचं प्रमुख बैठक ठिकाण आहे.
अशा ठिकाणचा स्लॅब कोसळत असताना जर सरकारला कळत नसेल तर हा आमचं सरकार पडणार नाही म्हणणाऱ्या सरकारसाठी हा संकेत आहे की काय असं दिसतंय.
आदित्य ठाकरे हे त्यावेळी तेथे होते त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही ही सुदैवाची बाब आहे.
जर स्लॅब कोसळताना त्यांना समजत नसले, तर सरकार कधी कोसळेल हेदेखील त्यांना कळणार नाही, असा टोला दरेकर यांनी लगावला.

किशोरी पेडणेकर त्रस्त

(Pravin Darekar) दरेकर पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्याचे सक्षम मुख्यमंत्री (CM) होते.
सध्या विरोधी पक्षातही ते चांगले काम करत आहेत त्यांना आणि भाजपला (BJP) एक जनाधार आहे.
त्यामुळे आम्हाला फ्रस्ट्रेशनमध्ये जाण्याचे काहीच कारण नाही.
आमच्या अशी टिप्पणी करणाऱ्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) या सध्या त्रस्त दिसत आहेत. फ्रस्ट्रेशन (Frustration) हे चेहऱ्यावर दिसत असल्याचे दरेकर म्हणाले.

आमचे नेते प्रसन्न चेहऱ्याने वावरतात

फडणवीस आणि भाजप नेते वेगवेगळ्या ठिकाणचे दौरे करत आहेत.
आमचे नेते प्रसन्न चेहऱ्याने वावरत आहेत.
जनतेची विचारपूस करत आहे.
परंतु मुंबईच्या महापौर आणि काही नेतेमंडळीच्या चेहऱ्यावर मात्र एक प्रकराचा त्रास दिसतोय, असा टोला दरेकर यांनी किशोरी पेडणेकर यांना लागावला.

Also Read:- 

Devendra Fadnavis : उत्तरप्रदेशातील गंगेतील मृतदेहांची महाराष्ट्रात चर्चा होते, पण…

Ajit Pawar : ‘प्री-वेडिंग’ शूटच्या माध्यमातून पर्यटन विकास साधा !

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे नवं ट्वीट

Dark Mode : डार्क मोडमध्ये कधीही वापरू करू नका स्मार्टफोन, जाणून घ्या कारण

Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ 2 महत्वाचे कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

खुशखबर ! भारतात मुलांना याच महिन्यात मिळू शकते व्हॅक्सीन, जाणून घ्या कुठपर्यंत पोहचली तयारी

नागिण 3 फेम अभिनेता पर्ल पुरी याला बलात्कार प्रकरणात अटक

Pune : पीएमपी संचालक राजीनामा नाट्याचा पुढील अंक ‘पोलिस ठाण्यात’ ! भाजपच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हल्ला’

 

Related Posts