IMPIMP

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha | बारामतीत लढायचे की नाही? आज शिवतारेंची सासवडमध्ये बैठक, कार्यकर्त्यांना विचारून घेणार निर्णय

by sachinsitapure
Vijay Shivtare

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –Vijay Shivtare On Baramati Lok Sabha| बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सूनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याविरूद्ध लढण्यासाठी सतत दंड थोपटणारे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मध्यस्थीनंतर माघार घेतली होती. अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि फडणवीसांसोबतच्या मनोमिलनाचा त्यांचा फोटोही सर्वत्र झळकला होता. मात्र, आता शिवतारे यांनी बारामतीच्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी सासवडमध्ये आज कार्यकत्र्यांची बैठक बोलावली आहे. (Vijay Shivtare On Baramati Lok Sabha)

विजय शिवतारे म्हणाले, अपक्ष लढण्याचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. २५ मार्च रोजी रात्री अडीच तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मुंबईत चर्चा झाली. रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही बारीक-सारिक विषयांवर चर्चा केली. माझे लोकांच्या बाबतीत काय म्हणणे आहे, ते मी मांडले. मतदारसंघातील लोकांच्या भावना मी त्यांच्यासमोर सांगितल्या.

शिवतारे म्हणाले, लोकांमधून मी निर्णय घेतला होता. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या बैठकीत साधारण
सकाळी ११ ते दुपारी दीड वाजेपर्यंत आम्ही चर्चा करणार आहोत. सर्वांची मते मी ऐकून घेणार आहे.
त्यानंतर लोकांसह कार्यकर्त्यांचा कल काय आहे, हे पाहून निर्णय घेईल. निर्णय घेऊनच मी मुंबईला जाणार आहे. त्यानंतर भूमिका जाहीर करेन.

विजय शिवतारे म्हणाले, शिंदे, फडणवीस व पवार काय म्हणाले, हे कार्यकर्त्यांना सांगणार आहे.
त्यांना विश्वासात घेऊन नक्की काय करायचे, हे तिथे ठरवले जाईल. जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही लढतो.
त्याबाबत काय चर्चा झाली, ती लोकांना सांगणार आहे. माघार शब्द वेगळा आहे, असे शिवतारे म्हणाले.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Related Posts