IMPIMP

Ajit Pawar and Nitin Gadkari | अजित पवारांना सकाळी-सकाळी नितीन गडकरींचा काॅल अन्….

by nagesh
Ajit Pawar and Nitin Gadkari | nitin gadkari called me early morning and said ajit come early lets talk about bridge design said dycm ajit pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Ajit Pawar | पुण्यात (Pune) आज (शुक्रवारी) उड्डाणपुलांचे भूमिपूजन सोहळा पार पाडला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) आणि उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान अजित पवारांनी म्हटले, मी पालकमंत्री म्हणून गडकरी साहेबाना पुण्याच्या तमाम जनतेकडून शुभेच्छा देतो. सकाळी गडकरी साहेबांचा फोन आला…असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मला मध्यंतरी गडकरींनी सांगितलं होतं मी मुंबईत येतो, उद्धवजी ठाकरे साहेब, तू, अशोक चव्हाण,
स्वत: गडकरी साहेब आणि त्यांची अधिकाऱ्यांची टीम, राज्य सरकारमधील काही प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत किंवा दोघांच्या समन्वयातील प्रश्न
सोडवण्यासाठी निर्णय घेण्याची गरज आहे.
त्याबाबतची मिटींग लावा. असं अजित पवार म्हणाले आहेत.
काल मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, उद्या गडकरी साहेबांसोबत 2 कार्यक्रम आहेत.
सीएम साहेबांनी सांगितलं, गडकरी साहेबांना जी वेळ सोईची आहे ती सांगावी, सह्याद्रीवर तशी मिटींग आयोजित करु. असं पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आत्तापण सकाळी गडकरी साहेबांचा फोन आला की अजित जरा 15 मिनिटे लवकर ये. पुलाच्या डिझाइनवर बोलायचं आहे.
आपण यातकाही वेगळ्या पद्धतीने विचार करत आहोत. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण नक्कीच करु पण ज्यावेळी निवडणुका संपतात त्यावेळी जनतेने निवडून
दिलेले जे लोकप्रतिनिधी असतात त्यांना विश्वासात घेऊन विकासकामात अडथळा न आणता आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असल्याचं पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलंं आहे.

Web Title : Ajit Pawar and Nitin Gadkari | nitin gadkari called me early morning and said ajit come early lets talk about bridge design said dycm ajit pawar

हे देखील वाचा :

Delhi Shootout | दिल्लीच्या रोहिणी कोर्टातील शूटआऊटचा थरारक व्हिडिओ, फायरिंग फायरिंग ओरडत पळत होते लोक (Video)

Maharashtra Rains | राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय ! पुढील 4 दिवसांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Maharashtra School Reopen | राज्यातील शाळा ‘या’ तारखेला सुरु होणार ! शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

Related Posts