IMPIMP

अनेक ख्यातनाम विचारवंताचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठबळ, म्हणाले…

by pranjalishirish
Anil Deshmukh | former maharashtra home minister anil deshmukh s bail application rejected by pmla court mumbai

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन- एखाद्या पोलीस अधिकार्‍याने राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप करावे आणि त्यावरून सार्वजनिक आयुष्यात 30 वर्षे निष्कलंकपणे काढलेल्या राजकीय नेत्याला चौकशीला सामोरे जावे लागावे, ही पुरोगामी महाराष्ट्रातील अतिशय विचित्र आणि चिंताजनक बाब असल्याचे सांगत नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत व बुद्धिजीवीवर्गांनी गृहमंत्री देशमुखांना Anil Deshmukh  पाठबळ दिले आहे. यामुळे कधी नव्हे इतके राज्याचे राजकारण गढूळ बनले आहे. सुजाण नागरिकांना हे अजिबात पसंत नाही. म्हणून ही सार्वत्रिक भावना आम्ही ठामपणे व्यक्त करत असल्याचे म्हटले आहे.

शिवसेनेकडून भाजपला टोला, म्हणाले – ‘किमान, व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका’

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे गृहमंत्री देशमुखांवरील Anil Deshmukh लेटर बॉम्ब, सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, उच्च न्यायालयातील सुनावणी, निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीचा राज्य सरकारचा निर्णय या घडामोडींमुळे राजकीय धुराळा उडाला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, डॉ. पूरण मेश्राम, अरूणा सबाने, डॉ. प्रदीप विटाळकर, प्रा. डॉ. दिवाकर गमे, बबन नाखले आदींनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनाबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता सर्वांनीच गृहमंत्री देशमुखांवरील Anil Deshmukh  आरोप व त्यावरून राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या विचित्र परिस्थितीबाबत स्पष्ट शब्दांत नापसंती व्यक्त केली. आम्ही व्यक्त केलेली ही भावना सगळ्याच सुजाण नागरिकांच्या मनात असल्याचे ते म्हणाले.

Also Read : 

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’

दुर्दैवी ! ‘कोरोना’मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नुकतेच सन्मानित झालेले जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कठोर निर्बंध लावणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

Related Posts