IMPIMP

Amol Mitkari | ‘भाजपचा पैसा घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा’ – अमोल मिटकरी

by nagesh
Amol Mitkari | NCP leader amol mitkari criticized bjp on roadshow of devendra fadnavis in nagpur today

बिलोली : सरकारसत्ता ऑनलाइन Amol Mitkari | नांदेड मधील देगलूर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुका (Deglur by-election) होत आहेत. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाल्यामुळे येथे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. याठिकाणी एका जागेसाठी अनेक पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यात ही लढत असणार आहे. प्रचारादरम्यान बोलताना राष्ट्रवादीचे (NCP) नेते अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) वादग्रस्त सल्ला दिला आहे.

अमोल मिटकरी (Amol Mitkari) बोलताना म्हणाले की, भाजपचा (BJP) पैसा घ्या, पण मतदान काँग्रेसलाच करा, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. आणि 2 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी या ठिकाणी एक जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना मिटकरी यांनी मतदारांना वादग्रस्त सल्लाही दिला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

अमोल मिटकरी म्हणाले, पंढरपूरमध्ये मतदारराजाकडून जी चूक घडली, माझी इथल्या मतदारांना विनंती आहे की, ही चूक घडू देऊ नका.
तुमचे मत मीठ मिरची एवढे स्वस्त समजून या दलालांपुढे गहाण ठेवू नका.
त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. त्यांचे एक-एक कार्यालय 30 हजार कोटींचे आहे.
आता दिवाळी आहे. आलाच पैसा तर लक्ष्मीला नाही म्हणू नका. फटाके, फराळ घ्या.
भाजपाचा पैसा घ्यायचा पण महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मतदान करा. असं ते म्हणाले.

 

 

Web Title: Amol Mitkari | amol mitkari controversial advice voters take bjp money vote maha vikas aghadi

 

हे देखील वाचा :

Parambir Singh | परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

ED | अजित पवारांना पुन्हा धक्का ! जगदीश कदम यांच्या निवासस्थानी ED ची धाड

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा ‘पंच’ किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी

 

Related Posts