IMPIMP

कोलकातामध्ये भाजपच्या कार्यालयाजवळ आढळले 51 क्रूड बॉम्ब

by omkar
Crud Bomb

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका चौकात भाजपच्या कार्यालयापासून जवळच ५१ क्रूड बॉम्ब (Crud Bomb) आढळून आले आहेत. याबाबत माहिती मिळताच बॉम्ब निष्क्रीय करण्यासाठी पथक घटनास्थळी दाखल झाले. हे सर देशी बॉम्ब असून त्याची तीव्रता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विहिंपनं व्यक्त केला संताप, म्हणाले – ‘ट्विटर ईस्ट इंडिया कंपनी सारखं वागायला लागलंय, इथूनच पैसा कमावायचा अन् …’

पथकाने हे बॉम्ब (Crud Bomb) निष्क्रिय केले असून कोलकाता पोलिसांच्या अँटी राऊडी सेक्शनने ते जप्त केले आहे. पोलिसांनी हे बॉम्ब कोठून आले याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल अन्य कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
यापूर्वीही पश्चिम बंगालमध्ये अशा घटना घडल्या आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही बॉम्ब सापडल्याच्या घटना घडल्या आहेत.
दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगर परिसरातून पोलिसांनी जवळपास २०० गावठी बॉम्ब जप्त केले होते. तर त्या आधीही दक्षिण २४ परगणा येथे झालेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता आणि पाच कार्यकर्ते हे जखमी झाले होते.
या घटनेवरून भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोपाच्या फैरी झाडत होत्या. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

Also Read:- 

पुण्यात शिवसेना 80 जागांवर लढणार – संजय राऊत

Ajit Pawar : ‘…तो पर्यंत कोणी मायेचा लाल महाविकास सरकार पाडू शकणार नाही’

Pravin Darekar : ‘… तर सरकार कधी कोसळेल हे देखील त्यांना कळणार नाही’

‘राज-उद्धव’ एकत्र येणार ?, खा. संजय राऊत म्हणाले…

Devendra Fadnavis : उत्तरप्रदेशातील गंगेतील मृतदेहांची महाराष्ट्रात चर्चा होते, पण…

Ajit Pawar : ‘प्री-वेडिंग’ शूटच्या माध्यमातून पर्यटन विकास साधा !

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे नवं ट्वीट

 

Related Posts