IMPIMP

Video : कडक निर्बंधांसाठी तयार राहा ! रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांचा जनतेला संदेश

by pranjalishirish
be prepared for strict restrictions says rajesh tope

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सतत वाढ होत असल्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत. यावरूनच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे  Rajesh Tope यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. लॉकडाऊन लावण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. त्याबाबत चर्चा निश्चितच सुरू असते. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकार अधिक कडक निर्बंध लादण्याचं पाऊल उचलणार आहे. त्यामुळं लोकांनी तशी मानसिक तयारी ठेवावी, असे सूचक भाष्य टोपे यांनी केलं आहे.

लवकरच PM मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील, ‘या’ भाजप खासदाराचा पंतप्रधानांना टोला

राजेश टोपे Rajesh Tope  यांनी राज्यात निर्बंधाबाबत संकेत देताना म्हणाले, संपूर्ण लॉकडाऊन न करता करोनाचा संसर्ग कसा थोपवता येईल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. गर्दी टाळणे हाच निर्बंध लावण्यामागचा मुख्य हेतू आहे. गर्दी कशी टाळता येईल. गर्दीच्या ठिकाणांवर कसे नियंत्रण ठेवता येईल होणारी जी काही ठिकाण आहेत, यासंदर्भातच नियोजन केले जात आहे. हे नियोजन पूर्ण झाल्यावर याची माहिती देण्यात येईल. सामाजिक अंतर (Social distance) काटेकोरपणे पाळले जावे या दृष्टिकोनातून पावलं उचलावी लागणार आहेत. गरजेनुसार त्याबाबतचे आदेश जारी केले जातात. तसेच याआधी १५ मार्च आणि २ दिवसांपूर्वी असे आदेश काढण्यात आले आहेत. करोना रुग्णांची संख्या अशीच राहणार असेल आणि लोक असेच बेजबाबदारपणे वागणार असतील तर निर्बंध कडक केले जातील असे ते म्हणाले, तर लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळणे हा एकमेव उपाय आहे. त्यामुळं ‘नियम पाळा, लॉकडाऊन टाळा’ असेही राजेश टोपे Rajesh Tope यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण आम्हालाही नाही पण आम्ही Online पाहणार – अनिल परब

दरम्यान, राज्यात काल २७ हजार ९१८ रुग्णांची भर पडली आहे. तर, १३९ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १ कोटी ९६ लाख २५ हजार करोना चाचण्या झाल्या असून त्यापैकी २७ लाख ७३ हजार ४३६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,५६,६९७ व्यक्ती होमक्वारंटाईन असून १७,६४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, एकूण २३ लाख ७७ हजार १२७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

Related Posts