IMPIMP

भाजपने पुन्हा रणनीती बदलली ? दुरावत असलेल्या OBC समाजाला भाजपची साद, अडगळीतील नेते पुन्हा मुख्य प्रवाहात

by pranjalishirish
bjp changed strategy again about OBC reservation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  ओबीसी आरक्षणासाठी OBC reservation  सर्व राजकीय पक्षातील ओबीसी लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकाऱ्यांनी पक्ष भेद विसरुन समाजासाठी एकत्र यावे, असे आवाहन भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले आहे. परिणय फुके यांनी पत्रक काढून सर्व ओबीसींनी राजकीय मतभेद विसरुन एका छताखाली यावे असे म्हटले आहे. मागिल काही दिवसांपासून भाजपने पुन्हा एकदा ओबीसी मतदारांना साद घालण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.

Devendra Fadnavis : ‘लवंगी होता तर ते एवढे घाबरले का?’

राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजाला जाहीर केलेले आरक्षण OBC reservation आणि त्यासाठी न्यायालयात लढा देण्यासाठी उभी केलेली वकीलांची फौज… राज्यात सत्ता गेल्यानंतर देखील मराठा आरक्षणासाठी केलेला पाठपुरावा. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाज दुखावला आहे. ओबीसी समाज हा भाजपचा हक्काचा मतदार असल्याने तेच नाराज झाले आहेत. त्यातच ओबीसीचे नेते पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे यांच्या बाबतीत पक्षाने जी भूमिका घेतली त्यामुळे ओबीसी समजात नाराजी पसरली.

100 कोटी खंडणी वसुलीच्या आरोपांनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि अनिल देशमुख यांची भेट, पुढं काय होणार?

दुसरीकडे, मराठा समाजाला आरक्षण OBC reservation  दिल्यानंतर गरीब मराठा मतदार हा ओबीसी सोबत भाजपशी जोडला जाईल. त्यामुळे ओबीसी मतदार हा भाजपसोबत कायमचा जोडला गेला तर भाजपची सत्ता राहील. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा भाजपचा हेतू होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपला मराठा समाजाने मतदान केले का ? असा प्रश्न विधानसभेच्या निकालानंतर उपस्थित करण्यात आला. तसेच भाजपचा हक्काचा समजला जाणारा ओबीसी समाज देखील भाजपवर नाराज झाला.

‘पुन्हा येण्यात अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची त्यांची जिद्द बघता कौतुक करावंसं वाटतं !’

मराठा समाज स्विकारत नसताना ओबीसी समाज दूरावतो कि काय अशी द्विधा मनस्थिती भाजपची झाली. त्यामुळे भाजपने मागील दोन महिन्यापासून मराठा आरक्षणासंदर्भात शांत राहण्याची भूमिका घेत ओबीसी कार्ड बाहेर काढले. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीला 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण OBC reservation  देता येणार नसल्याची भूमिका मांडली. त्यानंतर भाजपने विधानसभेवर ओबीसींना आरक्षण द्यावे यासाठी ओबीसींचा मोर्चा काढला.

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीविषयी राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठं वक्तव्य; म्हणाले…

ओबीसी समाजात पसरलेली नाराजी दूर करण्यासाठी भाजपने मागिल महिन्यात चिंतन बैठक घेतली. या बैठकीत ओबीसी हक्क परिषद घेण्याचा निर्णय भाजपने घेतला. एकीकडे चार वर्षात ओबीसी नेते भाजपमध्ये बाजूला गेले असताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांनी ओबीसी नेत्यांना ताकद दिली. यामध्ये नाना पटोले, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील या नेत्यांचा समावेश आहे.

प्रसिद्ध कृष्णा म्हणाला – ‘मला भागीदारी तोडणारा गोलंदाज व्हायचे आहे’

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून काँगेसमध्ये मराठा हे सत्ताकेंद्र राहिले. त्या जोडिला दलित आणि मुस्लीम हा काँग्रेसचा हक्काचा मतदार राहिला. त्यामुळे ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष झाल्याने ओबीसी समाजातील लोकांची घुसमट होत होती. ओबीसी समाजीची होत असलेली घुसमट भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष उत्तमराव पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व पुढे करत ओबीसी समाजाला भाजपशी जोडण्याचा प्रयत्न केला. याला संघटन मंत्री वसंतराव भागवत यांनी पाठींबा दिला. तर ना स फऱांदे आणि आण्णा डांगे यांची गोपीनाथ मुंडे यांना चांगली साथ मिळाली.

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

भाजपच्या ‘माधव’ म्हणजे माळी-धनगर-वंजारी या राजकीय फॉर्म्युल्याला चांगले यश आले. ज्या समाजातील लोकांना काँग्रेसने नेतृत्व दिले नाही. त्या लोकांना भाजपने नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. त्यामुळे ओबीसी हा भाजपचा हक्काचा मतदार असल्याचे गृहीत धरून हा समाज आपल्याला सोडणार नसल्याचे गृहित धरून मराठा मतदार जर आला तर कायम स्वरुपी सत्ता येईल, असा अंदाज भाजपला होता. मात्र भाजपचा हा आत्मविश्वास सत्यात उतरला नाही.

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त जागा जिंकून देखील भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे भाजपने अडगळीत टाकलेल्या सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, बावनकुळे या नेत्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यास सुरुवात केली. भाजपने नव्याने ओबीसी हक्क परिषद चळवळ सुरु केली. येत्या काळात मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका वर्षभरात होणार आहेत. त्यावेळी कोणाला किती आणि कसं राजकीय यश मिळते हे पहाणे महत्वाचे ठरेल.

Aslo Read : 

आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन, पुतळा जाळला

Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; जाणून घ्या पुणे-मुंबईतील आजचा भाव

घरचा आहेर देत ठाकरे सरकारमधील मंत्र्यानंच केलं ‘असं’ आवाहन, म्हणाले – ‘… तर अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा’

‘आर्किटेक्ट’ एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष सहभाग, नागपुरात राष्ट्रवादीकडून आंदोलन

‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण… ; निलेश राणेंची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

GROHE Hurun Report : मंगल प्रभात लोढा देशातील सर्वात ‘श्रीमंत’ बिल्डर, जाणून घ्या त्यांच्यासह इतर मोठया ग्रुपच्या संपत्तीबाबत

Related Posts